गर्भावस्थेमध्ये पूर्ण झोप मिळत नाहीये? मग हे उपाय करून पाहा!

र्भावस्था ही एक अशी स्थिती आहे, जेव्हा स्त्री शरीरात होणार्‍या सर्व बदलांना धैर्याने सामोरी जात असते.

गर्भावस्थेमध्ये पूर्ण झोप मिळत नाहीये? मग हे उपाय करून पाहा!
प्रतिकात्मक फोटो
| Updated on: Mar 05, 2021 | 10:59 AM

मुंबई : गर्भावस्था ही एक अशी स्थिती आहे, जेव्हा स्त्री शरीरात होणार्‍या सर्व बदलांना धैर्याने सामोरी जात असते. अशा वेळी, होणाऱ्या बाळाबद्दल नवनव्या अपेक्षा, कल्पना असतात. तसेच, त्याच्या सुरक्षिततेबद्दलची काळजी देखील असते. अशा परिस्थितीत बर्‍याच वेळा तणाव, चिंता यासारख्या समस्यांना स्त्रीला सामोरे जावे लागते आणि त्यातच ती नकारात्मक विचारांनी वेढली जाते. या समस्यांचा परिणाम तिच्या गर्भावरही होतो. अशा परिस्थितीत ‘या’ काही टिप्स बर्‍यापैकी उपयुक्त ठरू शकतात. (Can’t sleep during pregnancy Then try this tips)

-गर्भावस्थेच्या सुरूवातीला महिल्यांना लघवी वारंवार येत त्यामुळे रात्रीच्या वेळी झोप अनेकदा लागत नाही. यामुळे महिलांची चिडचिड वाढते.

-गर्भावस्थामध्ये आपल्या शरीरातील हार्मोन्स असंतुलीत होतात. ज्यामुळे झोपेची समस्या उद्भवू शकते.

-बर्‍याच वेळा गॅस, आणि छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवते. यामुळे अस्वस्थ वाटते आणि झोपू शकत नाही. जर तुम्ही अशाप्रकारच्या समस्यांमधून जात असाल तर खाली दिलेल्या टिप्स वापरा…

हे उपाय करा

-जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर दिवसा थोडावेळ झोपण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या शरीराला जेवढी झोप पाहिजे तेवढी मिळेल.

-गर्भावस्थेमध्ये पौष्टिक अन्न् सर्वात महत्वाचे आहे. जर गर्भावस्थेमध्ये तुम्हाला योग्य आहार मिळत नसेल तर व्हिटॅमिन बीमुळे देखील तुम्हाला झोप लागत नाही. आहारात संपूर्ण कडधान्य, मासे आणि हिरव्या भाज्या घ्याव्यात.

-शक्यतो गर्भावस्थेमध्ये रात्री उशीरा जेवण करणे टाळले पाहिजे. झोपण्याच्या अगोदर किमान दोन ते तीन तास अगोदर जेवन केले पाहिजे.

-रात्री टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपपासून दूर रहा. झोपण्याची एक वेळ ठरवा दररोज झोपताना पुस्तक वाचण्याची किंवा संगीत ऐकण्याची सवय लागा. यामुळे तुम्ही सहज झोपू शकता.

-शक्यतो तुमच्या रूमचे तापमान गरम ठेऊ नका कारण गरम तापमानामध्ये लवकर झोप लागत नाही.

-रात्री उशिरा कॉफी, चहासारखे पेय पिणे टाळा.

संबंधित बातम्या : 

(Can’t sleep during pregnancy Then try this tips)