
दैनंदिन आयुष्यातली बऱ्याच घडामोडी आपल्याला त्रासदायक ठरतात. एखादी चूक तर आपल्याला आयुष्यभर सहन करावी लागते. त्यामुळे अशा चुका वेळीच टाळता येणं गरजेचं आहे. चाणक्य नीतित याबाबत सखोल मार्गदर्शन दिलं आहे. त्यामुळे चाणक्य नीति आजही लोकांमध्ये लोकप्रिय आहे. लग्न करताना पती पत्नीमध्ये किती वयाचं अंतर असावं याबाबतही त्यात सांगितलं आहे. साधारणत: भारतीय समाजात मुलाचं वय हे मुलीपेक्षा जास्त असावं असा पक्कं मनात रुजलेलं आहे. मग त्या मुलाचं वय एका वर्षाने जास्त असो की दहा वर्षांनी.. पण मुलगा मुलीपेक्षा मोठा असावा, अशी धारणा आहे. पण कधी कधी प्रेमात असं होतं की मुलींचं वय हे मुलांपेक्षा अधिक असतं. त्यामुळे हे लग्न करावं की नाही असा प्रश्न पडतो. पत्नी वयाने मोठी असल्याची अनेक मोठी उदाहरणं आहेत. यात ऐश्वर्या राय- अभिषेक बच्चन, प्रियंका चोप्रा- निक जोनस या लोकप्रिय जोड्या आहे. पण त्यांचं नातं टिकलं आहे. पती आणि पत्नीत किती अंतर असावं ते जाणून घेऊयात चाणक्य नीतिच्या माध्यमातून
चाणक्य नीतिनुसार, पती पत्नी यांच्या वयात अंतर फार नसावं. हे अंतर फार तर 3 ते 5 वर्षांचं असावं. हे अंतर कमी असल्यास एकमेकांना समजून घेण्यास मदत होते. वैवाहिक आयुष्यही व्यवस्थित असतं. पण हे अंतर अधिक असेल तर पती पत्नीत वादाचं कारण ठरतं. कारण वयाची तफावत असल्याने विचार करण्याची पद्धत भिन्न असते. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचं दृष्टीकोन बदलतो. एखादी गोष्ट व्यक्तीला योग्य वाटत असेल. तर दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या भावना आणि अपेक्षांच्या तुलनेत त्यात उणीव वाटू शकते. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो आणि खटके उडतात.
चाणक्य नीतिनुसार, वयाने खूप मोठ्या असलेल्या मुलाने कमी वयाच्या मुलीशी लग्न करू नये. कारण यामुळे दोघांचे विचार जुळणं कठीण होतं. त्यामुळे वैवाहिक आनंद फार काळ टिकत नाही. रोज काही ना काही वाद होत राहतात. त्यामुळे जोडीदार निवडतात वयातील अंतर 3 ते 5 वर्षे असावं. पण एखाद्या वयाने मोठ्या असलेल्या तरुणावर प्रेम जडलं तर लग्न करण्यापूर्वी एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आचारविचारांबाबत कळतं. दोघांमध्ये चांगला तालमेल असेल तर वय हा फक्त आकडा ठरतो. अशा स्थितीत नातं चांगल्या प्रकारे टिकू शकतं.