AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाणाक्य म्हणतात नवऱ्याने बायकोला चुकूनही सांगू नयेत ‘या’ गोष्टी; अन्यथा अडचणीत होईल वाढ

असं म्हणतात की नवरा-बायकोने एकमेकांपासून कोणत्याही गोष्टी लपवल्या नाही पाहिजे. पण कोणतही नातं टिकून ठेवण्यासाटी त्यात प्रेम आणि विश्वास असणं फार गरजेचा असतं त्याचवेळी काही गोष्टी न सांगणंही तितकचं महत्त्वाचं असतं. वैवाहिक जीवन आनंदी राहण्यासाठी हा सल्ला लागू होतो जास्त करून पतीला. म्हणजे पतीने काही गोष्टी पत्नीसोबत शेअर न करणे किंवा ते सांगणे टाळणे योग्य राहते. अन्यथा घरात वाद होत राहतात.

चाणाक्य म्हणतात नवऱ्याने बायकोला चुकूनही सांगू नयेत 'या' गोष्टी; अन्यथा अडचणीत होईल वाढ
| Updated on: Dec 03, 2024 | 5:00 PM
Share

कोणतही नातं टिकून ठेवण्यासाटी त्यात प्रेम आणि विश्वास असणं फार गरजेचा असतं पण काहीवेळेला काही गोष्टी न सांगणंही तितकचं महत्त्वाचं असतं. वैवाहिक जीवन आनंदी राहण्यासाठी तर हा सल्ला अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आणि हा सल्ला लागू होतो जास्त करून पतीला. म्हणजे पतीने काही गोष्टी पत्नीसोबत शेअर करू नयेत. अन्यथा नातं तर कमकुवत तर होईलत पण घरात वादही होत राहतील.

हा सल्ला दिला आहे आचार्य चाणक्य यांनी. हो, देश, राजकारण, समाज आणि समाजाशी संबंधित अनेक गोष्टीबद्दल आपल्या नीतीमध्ये लिहिलं आहे. ज्याचा फायदा आजही लोकांना होतो. चाणाक्य नीती तर भारतातच नाही जगभरात फेमस आहे. पाहुयात की चाणाक्य नीतीमध्ये नेमकं याबाबत काय सांगितलं आहे.

चाणक्य यांनी पुरुषांसाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामुळे त्यांना त्यांचं नातं टिकवण्यात फायदा होईल.

पहिलं गोष्ट म्हणजे कमजोरी किंवा कमकुवतपणा

पुरुषांनी आपली कमजोरी नेहमी कधीच आपल्या पत्नीला सांगू नये. अन्यथा, मुद्दाम हेतूने नाही पण अनावधानाने किंवा रागात पतीच्या कमकुवतपणाचा पत्नी फायदा घेऊ शकते. ज्यामुळे सार्वजनिक जीवनात पतीला या गोष्टीमुळे अडचण होऊ शकते.

झालेला अपमान

कोणतीही बायको आपल्या पतीचा थोडासा अपमानही सहन करू शकत नाही. यामुळे बायकोला कधीच अपमानाबद्दल कधीही सांगू नये. अशा परिस्थितीत वाद शांत होण्याऐवजी राग वाढू शकतो, ज्याचा फटका संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो. त्यामुळे ही गोष्ट सांगणे टाळल्यामुळे वैवाहिक जीवन सुखी आणि शांत राहते.

दान केलेली रक्कम

शास्त्रात असे सांगितले आहे की खरे दान तेच आहे जे तुमच्याशिवाय इतर कोणाला कळू नये. तुमचा जोडीदार कंजूष किंवा लोभी असेल तर केलेल्या दानाबद्दल कळल्यावर तो तुमच्याशी भांडू शकतो. त्यामुळे पती-पत्नीने कधीही एकमेकांना दिलेले दान सांगु नका.

पगार किंवा कमाई

चाणक्य नीतीनुसार पतीने पत्नीला त्याच्या कमाईबद्दल पूर्णपणे कधीच सांगू नये. कारण काही वेळेला नवऱ्याचा पगार जास्त असेल तर बायका जास्त खर्च करतात किंवा कमी पगार असेल तर रागात किंवा वादात टोमणे मारतात. यामुळे पुरूषांनी त्यांच्या बायकोला संपूर्ण कमाई कधीच सांगु नये. अर्थातच सर्व बायका अशा नसतात. पण असं असलं तरी काळजी घेतलेली केव्हा ही चांगली. आधी बायकोचा स्वभाव तपासा मगच तिला सांगा.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.