हिवाळ्यात गाल लाल होतात, त्यामुळे शरीरात ‘या’ गोष्टीची असू शकते कमतरता

हिवाळ्यात शरीराला ऊर्जा मिळावी यासाठी अनेकजण उन्हात बसतात. त्यामुळे काहींचे गाल लाल होतात. पण ही गोष्ट अनेकजण सामान्य मानतात, पण शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हे होऊ शकतं. जर तुमच्याबाबतीतही असे होत असेल तर व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही या मार्गांचा अवलंब करू शकता.

हिवाळ्यात गाल लाल होतात, त्यामुळे शरीरात या गोष्टीची असू शकते कमतरता
Cheeks Red Due To Lack Of Vitamin D
Image Credit source: Pexels
| Edited By: | Updated on: Jan 06, 2025 | 11:53 PM

थंडीचे दिवस सुरु झाले असून अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढलेला आहे. अशातच हिवाळ्यात सूर्यप्रकाश क्वचितच दिसतो. तेव्हा आपल्यापैकी अनेकजण कोवळ्या सूर्यप्रकाशात जाऊन बसतात. पण उन्हात बसल्यानंतर काही लोकांचे गाल लाल होऊ लागतात. जरी हे सामान्य वाटेल, परंतु तुम्हाला माहित आहे का की हे गंभीर कमतरतेचे लक्षण देखील असू शकते? हिवाळ्यात थंडी आणि सूर्यप्रकाशामुळे असे होते असल्याचं अनेकांचं समज आहे, परंतु प्रत्यक्षात हे शरीरात काही पोषक तत्वांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. शरीरात असे अनेक महत्त्वाचे घटक असतात जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि त्यांच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेताना गाल लाल होत असतील तर हे शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते. व्हिटॅमिन डीला “सनशाइन व्हिटॅमिन” देखील म्हणतात कारण ते आपल्या शरीरात तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो, ज्यामुळे व्हिटॅमिन डीची पातळी कमी होते. अशावेळी जर शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर त्याचा परिणाम त्वचेवर होतो. गाल लाल होणे, कोरडी त्वचा आणि थंड हवामानात अधिक संवेदनशील वाटणे ही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची सामान्य लक्षणे आहेत.

सूर्यप्रकाश

व्हिटॅमिन डीचा सर्वात नैसर्गिक स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. जेव्हा तुमची त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा त्याचे रूपांतर शरीरात व्हिटॅमिन डीमध्ये होते. दररोज किमान १०-२० मिनिटे उन्हात बसण्याचा प्रयत्न करा.

आहाराची काळजी घ्या

मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ यासारख्या तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करा. याशिवाय तुम्ही फोर्टिफाइड सोया मिल्क, ओट्स आणि संत्र्याचा ज्यूसदेखील पिऊ शकता.

निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा

निरोगी जीवनशैलीसाठी चांगली झोप, ताणतणावर नियंत्रण आणि शारीरिक हालचाली या खूप महत्वाच्या आहेत. हे केवळ तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी शोषून घेत नाही तर तुमचे आरोग्य देखील पूर्णपणे चांगले ठेवते.