वाढलेल्या वजनावर रामबाण उपाय म्हणजे ‘लवंग चहा’, जाणून घ्या रेसिपी

| Updated on: Apr 10, 2021 | 2:20 PM

आपल्या सर्वांच्याच स्वयंपाक घरात लवंग आढळते. बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये लवंगचा वापर केला जातो.

वाढलेल्या वजनावर रामबाण उपाय म्हणजे ‘लवंग चहा’, जाणून घ्या रेसिपी
लवंग
Follow us on

मुंबई : आपल्या सर्वांच्याच स्वयंपाक घरात लवंग आढळते. बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये लवंगचा वापर केला जातो. आयुर्वेदातही लवंगाशी संबंधित बरेच उपाय नमूद केले गेले आहेत. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, वजन कमी करण्यासाठी लवंग अत्यंत फायदेशीर आहे. लवंगमध्ये असलेले गुणधर्म तुमची पचनशक्ती वाढवते. जर आपल्याला चहा जास्त आवडत असेल तर आपण चहामध्ये लवंग देखील वापरू शकता. लवंग चहा पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. (Clove tea is beneficial for weight loss)

कसा तयार करायचा लवंग चहा

साहित्य

2 कप पाणी

4-5 लवंगा

1/2 इंचाची दालचिनीची काडी

1/2 इंचाचा आले

गूळ

लिंबाचा रस
एका भांड्यात 2 कप पाणी घाला आणि उकळल्यानंतर त्यात 4 ते 5 लवंगा, दालचिनी आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घाला. सुमारे 15 ते 20 मिनिटे याला उकळी येऊ द्या. त्यानंतर, हा चहा गाळा आणि वर एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून प्या.
वजन कमी करण्यासाठी लवंग चहा अत्यंत फायदेशीर आहे.

आपण जर दररोज हा चहा घेतला तर आपले वजन कमी होण्यास मदत होईल. सकाळी जर आपण व्यायामाला जात असाल तर हा चहा घ्या यामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. मसालेदार चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

परंतु, जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्याने आपले नुकसान देखील होऊ शकते. दिवसातून 1 ते 2 वेळाच लवंगयुक्त चहा प्या. जास्त चहा घेतल्यामुळे स्नायू वेदना, पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी लवंगाचे जास्त सेवन करू नये. जास्त मसाले खाणे आपल्या बाळासाठी हानिकारक आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss | Intermittent Fasting दरम्यान ‘ब्लॅक कॉफी’ पिणे ठरेल फायदेशीर! जाणून घ्या कसे…

Anjeer Benefits | हिवाळ्यात अंजीर खायलाच हवे, आरोग्याला होतील अनेक फायदे!

(Clove tea is beneficial for weight loss)