AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या आजारामध्ये होतात असह्य वेदना; माणूस मागू लागतो मरण, सलमान खानलाही होता हा आजार

असे दोन आजार आहेत ज्यात एवढ्या वेदना होतात की त्या वेदना लोक सहन करू शकत नाहीत. परिस्थिती अशी बनते की या वेदनांनी ग्रस्त असलेले लोक देवाकडे मृत्यूसाठी प्रार्थना करू लागतात. एवढंच नाही तर यातील एका आजाराचा त्रास हा सलमान खानने देखील सहन केला आहे.

या आजारामध्ये होतात असह्य वेदना; माणूस मागू लागतो मरण, सलमान खानलाही होता हा आजार
salman khanImage Credit source: Meta AI
| Updated on: Jun 22, 2025 | 10:19 AM
Share

एखाद्या आजारपणात वेदना होणे किंवा मनस्थिती बिघडणे या गोष्टी बऱ्याचदा घडतात. काही वेळेला तर वेदना सहन होत नाही. बऱ्याचदा ही अशी स्थिती कॅन्सरसारख्या आजारामध्ये होताना दिसते. पण याहीपेक्षा असे दोन आजार आहेत ज्यांमुळे लोक वेदना सहन करू शकत नाहीत. परिस्थिती अशी बनते की या वेदनांनी ग्रस्त असलेले लोक देवाकडे मृत्यूसाठी प्रार्थना करू लागतात. हे आजार म्हणजे क्लस्टर डोकेदुखी आणि ट्रायजेमिनल न्यूराल्जिया. या दोन आजारांदरम्यान रुग्णांना होणारा त्रास पाहून कोणालाही धक्का बसेल. या आजारांची लक्षणे कोणती आहेत आणि ते कसे टाळता येतील. जाणून घेऊया…

क्लस्टर डोकेदुखी

डोकेदुखी ही एक सामान्य गोष्ट आहे. थकवा किंवा जास्त काम करताना ही समस्या अनेकदा जाणवते. पण क्लस्टर डोकेदुखी यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे तीव्र जळजळ आणि असह्य वेदना होतात. हे एका डोळ्याभोवती किंवा चेहऱ्याच्या एकाच भागात होऊ शकते. प्रत्येक वेळी डोकेदुखी 15 मिनिटांपासून तीन तासांपर्यंत टिकू शकते. वैद्यकीय भाषेत याला प्राथमिक डोकेदुखी विकार म्हणतात. वेदनेमुळे डोळ्यांना सूजही येते आणि नाक बंद होण्याच्या तक्रारी असतात. बऱ्याचदा ही वेदना डोळ्याभोवती आणि चेहऱ्यावर जाणवते. या वेदनेमध्ये रात्रीची झोपही उडते आणि दिवसाही अस्वस्थ वाटतं.

क्लस्टर डोकेदुखी कशी टाळायची

उष्ण वातावरण टाळा: जर क्लस्टर डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर जास्त वेळ उन्हात राहणे आणि उष्ण वातावरण असलेल्या ठिकाणी जाणे टाळा. व्यायाम: तीव्र व्यायाम करणे टाळा. असे केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते, ज्यामुळे पुन्हा क्लस्टर डोकेदुखीचा धोका वाढू शकतो. झोपेची पद्धत: योग्य झोप घ्या. त्याची दिनचर्या ठरवा. झोप पूर्ण होईल याची काळजी घ्या. आहार: प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. धूम्रपान आणि मद्यपान: या दोन्ही वाईट सवयी क्लस्टर डोकेदुखीचा धोका वाढवतात. त्यांच्यापासून दूर रहा.

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया म्हणजे काय?

या आजाराबद्दल जाणून घेण्यापूर्वी, ट्रायजेमिनल नर्व्ह म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचं आहे? ही मज्जातंतू मानवी शरीरात चेहरा आणि मेंदू यांच्यामध्ये संदेशवाहक म्हणून काम करते. म्हणजेच, ती चेहऱ्यावरून मेंदूला वेदना, स्पर्श आणि तापमानाशी संबंधित संवेदना पाठवते. जर ट्रायजेमिनल नर्व्हवर दबाव आला किंवा ती खराब होऊ लागली, तर ट्रायजेमिनल नर्व्हची स्थिती उद्भवते.

आरोग्य तज्ञांच्या मते, या आजारामुळे खूप वेदना होतात. याच्या वेदना इतक्या असह्य असतात की दात स्वच्छ करतानाही त्रास होतो. चेहऱ्याची त्वचा इतकी संवेदनशील होते की त्याला स्पर्श केल्यानेही विजेचा झटका लागावा तसं जाणवू लागतं. आरोग्य तज्ञांच्या मते, ट्रायजेमिनल नर्व्ह हा एक प्रकारचा क्रॉनिक पेन आजार आहे. त्याचे कारण अद्याप सापडलेले नाही. बॉलिवूड अभिनेता सलमान खान देखील या धोकादायक आजाराशी झुंजला आहे. त्यावर त्याने अनेक उपचारही केले आहेत.

(डिस्क्लेमर: या आजारांचे कोणतेही लक्षणे जाणवत असतील , जास्तच डोकेदुखीचा त्रास होत असेल तर या वेदना, आजार अंगावर न काढता लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.