उन्हाळ्यात स्किन केअर साठी वापरा कोकोनट वॉटर फेस स्प्रे, कसं बनवणार? वाचा

| Updated on: May 28, 2023 | 12:11 PM

आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कोकोनट वॉटर फेस स्प्रे बनवण्याची पद्धत. दररोज कोकोनट वॉटर फेस स्प्रे वापरामुळे चेहऱ्यावरील तुमची काळी वर्तुळे नाहीशी होतात. यामुळे तुमची त्वचा मॉइश्चरायझ राहते, ज्यामुळे तुमची त्वचा दररोज चमकदार आणि फ्रेश दिसते.

उन्हाळ्यात स्किन केअर साठी वापरा कोकोनट वॉटर फेस स्प्रे, कसं बनवणार? वाचा
Coconut face mist
Follow us on

मुंबई: नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी आणि प्रोटीन सारखे अनेक अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कोकोनट वॉटर फेस स्प्रे बनवण्याची पद्धत. दररोज कोकोनट वॉटर फेस स्प्रे
वापरामुळे चेहऱ्यावरील तुमची काळी वर्तुळे नाहीशी होतात. यामुळे तुमची त्वचा मॉइश्चरायझ राहते, ज्यामुळे तुमची त्वचा दररोज चमकदार आणि फ्रेश दिसते. त्याचबरोबर नारळाचे पाणी तुमचा रंग देखील सुधारते, ज्यामुळे तुम्हाला गोरी त्वचा मिळते, तर चला जाणून घेऊया कोकोनट वॉटर फेस स्प्रे कसे बनवायचे.

कोकोनट वॉटर फेस स्प्रे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • नारळ पाणी एक कप
  • काकडी

कोकोनट वॉटर फेस स्प्रे कसे बनवायचे?

  • नारळाचे पाणी चेहऱ्यावर स्प्रे करण्यासाठी प्रथम काकडी घ्या.
  • नंतर ते चांगले धुवून किसून घ्या.
  • यानंतर काकडीचा रस काढून एका भांड्यात ठेवावा.
  • मग त्यात एक कप नारळ पाणी घाला.
  • यानंतर तुम्ही हे दोन्ही ज्यूस एकत्र चांगले मिसळा.
  • नंतर ते स्प्रे बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.
    आता तुमच्या नारळाच्या पाण्याचे स्प्रे तयार झाले आहे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)