पिकअपपासून ते लँड क्रूझरपर्यंत ‘धुरंधर’ चित्रपटात वापरण्यात आल्या या आयकॉनिक कार
रणवीर सिंहच्या धुरंधर या चित्रपटात पॉवरफुल अॅक्शन कार वापरण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट ऑटोप्रेमींची देखील मने जिंकत आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की धुरंधर चित्रपटात कोणत्या कार वापरण्यात आल्या आहेत...

देसी पिकअपपासून ते लँड क्रूझरपर्यंत, रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘या’ आयकॉनिक कारने ऑटोप्रेमींना लावले वेड
देसी पिकअपपासून ते लँड क्रूझरपर्यंत ‘धुरंधर’ चित्रपटात वापरण्यात आल्या या आयकॉनिक कार
रणवीर सिंहचा नवीन चित्रपट “धुरंधर” सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची दमदार कथा, दमदार संवाद आणि उच्च दर्जाच्या अॅक्शनसह, हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. त्यामुळे हा धुरंधर चित्रपट प्रत्येक चित्रपटगृहांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घालत आहे.हा चित्रपट एक आकर्षक स्पाय थ्रिलर म्हणून ओळखला जात आहे, परंतु या चित्रपटात ऑटोमोबाईल प्रेमींची मने जिंकणारा आणखी एक अनोखा पैलू आहे. “धुरंधर” मध्ये दाखवलेल्या पॉवरफुल आणि आयकॉनिक कारने अॅक्शनला अधिक वास्तववादी आणि रोमांचक बनवले आहे. चला तर या चित्रपटात कोणत्या या गाड्या वापरण्यात आल्या आहेत त्या जाणून घेऊयात.
Lexus LX 470
चित्रपटात अभिनेता संजय दत्त साकारत असलेलं पात्र एसपी अस्लम चौधरी हे Lexus LX 470 ही कार वापरत असल्याचं दिसत आहे. तर पांढऱ्या रंगांची मजबूत SUV कार संजय दत्त साकारत असलेल्या पात्राला अगदी सुट होत आहे. या चित्रपटात बंदुकीच्या गोळ्यांपासून वाचत जाण्याचे सीन असो किंवा पाठलाग करणे असो, Lexus LX 470 कार प्रत्येक सीनमध्ये तिची भारदस्त छाप उमटवतं आहे. तसेच चित्रपटाच्या हाय-अॅक्शन सीनमध्ये भर घालते.
Land Cruiser Defender
Isuzu D-Max ही कार रहमान डाकूच्या ताफ्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी करत आहे. या कारची पिकअप खडतर रस्त्यांवर आणि वेगाने पाठलाग करताना सहजतेने दिसते. तसेच ही कार ऑफ-रोड क्षमता आणि मजबूत बॉडीमुळे चित्रपटातील धोकादायक सीन परिपूर्ण बनवते.
Tata Xenon
चित्रपटात टाटा झेनॉनला लियारी टास्क फोर्सचे ऑफिशियल गाडी असल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटात ही पीकअप कारचा वापर शत्रुचा पाठलाग करून त्यांचा रस्ता अडवणे आणि चेज सीनमध्ये केला आहे. या कारची मजबूत बॉडी आणि विश्वासार्ह परफॉर्मेंसमुळे सीन अधिक वास्तववादी वाटतात.
Toyota Land Cruiser FJ60
अभिनेता अक्षय खन्ना यांचे पात्र टोयोटा लँड क्रूझर FJ60 चालवताना दिसत आहे. ही क्लासिक एसयूव्ही जी तिच्या मजबूतपणा आणि ऑफ-रोड ओळखीसाठी ओळखली जाते. त्यामुळे कारचा लुक आणि बॉडी चित्रपटाला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाते.
