AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Couple Date : डेटवर गेल्यावर मुली हमखास मुलांच्या या गोष्टी करतात नोटीस, एक चूकही पडेल महागात

तुम्ही पहिल्यांदाच डेटवर जात असाल तर खास करुन मुलांनी या गोष्टी लक्षात घेणंं महत्त्वाचं आहे. कारण मुली डेटवर मुलांच्या या गोष्टी हमखास नोटीस करतात.

Couple Date : डेटवर गेल्यावर मुली हमखास मुलांच्या या गोष्टी करतात नोटीस, एक चूकही पडेल महागात
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 16, 2023 | 8:14 PM
Share

मुंबई : सध्याचे तरूण-तरूणी रिलेशनशीपमध्ये येण्याअगोदर एकमेकांना नीट जाणून घेण्यासाठी डेटवर जातात. डेटवर जाण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतोच. पण जर तुम्ही पहिल्यांदाच डेटवर जात असाल तर खास करुन मुलांनी या गोष्टी लक्षात घेणंं महत्त्वाचं आहे, कारण मुली डेटवर मुलांच्या या गोष्टी हमखास नोटीस करतात.

पहिली डेट खूप स्पेशल आणि खास असते. डेटवर जायचं असेल तर प्रत्येकजण खास तयारी करून जात असतो. कारण या डेटमध्ये आपल्याला भावी आयुष्यातील जोडीदार किंवा जोडीदाराच्या अनेक गोष्टी लक्षात येतात. पण पहिली डेट असल्यामुळे एक्साईटमेंट असते.

बोलण्याची पद्धत

जर तुम्ही पहिल्यांदा डेटवर जात असाल तर सर्वात आधी तुम्ही त्या व्यक्तीची पर्सनॅलिटीबद्दल जाणून घ्या, की त्याची बोलण्याची शैली कशी आहे. तो ओरडून तर बोलत नाही ना? तो तुमचं मत ऐकायचं सोडून स्वतःचं बोलण्याचा प्रयत्न करत आहे का? या सर्व गोष्टींमधून समोरच्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत समजते.

बॉडी लँग्वेज

डेटवर गेल्यावर तरूणाची बॉडी लँग्वेज कशी आहे. तुम्ही तिच्याकडे कशा पद्धतीने पाहत आहात?  तुम्ही तिचं बोलणं ऐकत आहे का?  ती रिलॅक्स आणि कम्फर्टेबल आहे का?  तरूणाची बॉडी लँग्वेज कशी आहे? मुली हे सर्व नोटीस करतात.

इतर लोकांबद्दलची त्याची वृत्ती

तुम्ही ज्या मुलीसोबत डेटवर गेला आहात तिचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. स्वभाव जाणून घेण्यासाठी, मुली गार्ड किंवा वेटर यांसारख्या इतर लोकांशी तुम्ही कसे वागता हे त्या पाहतात. काहीजण अशा लोकांशी नीट वागत नाहीत. कारण उद्या तुम्ही तिच्यासोबतही असे वागण्याची भीती तिला असते.

टेबल मॅनर्स

तुमची खाण्याची पद्धत देखील त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे हे सांगते. तुम्ही एकदम वेगाने खात असेल किंवा पदार्थ खाली सांडत असेल तर ते चांगलं नाही. या गोष्टीचा तुमच्या नात्यावर परिणाम होत नाही, पण तुमच्या खाण्याच्या पद्धतीवरही तुमचे व्यक्तिमत्व दिसून येतं. तुमच्याकडे मॅनर्स आहेत की नाहीत हेही दिसून येते. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत गेला असाल तर या गोष्टींची काळजी नक्की घ्या.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच