AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shooping : 500 ची जीन्स अन् 300 चा शर्ट, या मार्केटमध्ये ब्रँडेड कपडे मिळतात अगदी कवडीमोल भावात

Shooping : तरुणांमध्ये जिन्सची क्रेझ कायम असते. पण मॉल आणि शॉपमध्ये शॉपिंग करणं खर्चीक असत. पण प्रत्येक शहरात असे काही ठिकाण असतात जेथे स्वस्त कपडे मिळतात. तर असं एक मार्केट आहे, जिथे 500 रुपयांमध्ये जिन्स आणि 300 रुपयांमध्ये जिन्स मिळते...

Shooping : 500 ची जीन्स अन् 300 चा शर्ट, या मार्केटमध्ये ब्रँडेड कपडे मिळतात अगदी कवडीमोल भावात
| Updated on: Sep 20, 2026 | 1:31 PM
Share

Shooping : आता ज्या मार्केटबद्दल आपण जाणून घेणार आहोत, ते मार्केट मध्य प्रदेश येथील रीवा शहरात आहे. रीवा शहरात गणेशोत्सवा दरम्यान बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे. सणासुदीच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये लोकांची गर्दी उसळली असून, विशेषतः कपड्यांच्या दुकानांमध्ये आणि सेलमध्ये तरुणांचा ओढा दिसून येत आहे. शिल्पी प्लाझा आणि खन्ना चौकाजवळ मिळणाऱ्या स्वस्त आणि फॅशनेबल कपड्यांच्या ऑफर्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत. तरुणांमध्ये जीन्सचं क्रेझ कायम असून, त्यांची शर्ट, टी-शर्ट किंवा कुर्त्याला देखील पसंती असते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते तरुणांपर्यंत याची मागणी कायम आहे. रीवा महानगरपालिकेजवळ खन्ना चौकात भरणार्‍या बाजारात फक्त 500 रुपयांत जीन्स मिळत असल्याचा सांगितलं जात आहे. येथे 300 ते 500 रुपयांच्या दरम्यान शर्ट, टी-शर्ट आणि कुर्ते देखील उपलब्ध आहेत.

फूटपाथवर दुकान लावणारे व्यापारी महेंद्र खान यांच्या मते, कपड्यांची किंमत सुमारे 200 रुपयांपासून सुरू होते आणि 1 हजार रुपयांच्या बजेटमध्येही ग्राहक विविध प्रकारचे कपडे खरेदी करू शकतात. या बाजारात जीन्सव्यतिरिक्त लोअर, पँट-शर्ट आणि टी-शर्ट देखील मिळतात. एवढंच नाही तर, काश्मीर आणि लुधियानाहून आलेले व्यापारी गरम कपड्यांची विक्री करतात. व्यापाऱ्यांच्या मते, हा रीवातील जुन्या मार्केटपैकी एक असून सणासुदीच्या हंगामात येथे खरेदी वाढते. सध्या सुरू असलेली सेल फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

ओम कलेक्शनमध्ये विशेष ऑफर

राज विलास हॉटेलसमोर असलेल्या ‘ओम कलेक्शन’मध्येही तरुणांसाठी विशेष ऑफर देण्यात आली आहे. येथे जीन्स 400 रुपयांना आणि शर्ट 300 रुपयांपासून मिळत असल्याची माहिती मिळाली आहे. या ऑफरची माहिती समोर आल्यानंतर विशेषतः कॉलेजचे तरुण-तरुणी आणि नोकरदार तरुणांची गर्दी पाहायला मिळत आहे.

बजेट-फ्रेंडली कलेक्शन

दुकान मालक प्रकाश केसवानी यांच्या मते, ग्राहकांचं बजेट लक्षात घेऊन विशेष कलेक्शन तयार करण्यात आलं आहे. यात जीन्स, शर्ट, टी-शर्ट आणि ट्रेंडी कपड्यांचा समावेश आहे. त्यांच्या मते, ग्राहक सुमारे हजार रुपयांमध्ये संपूर्ण सणासुदीचा ड्रेस कलेक्शन तयार करू शकतात.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...