उंदरांचा त्रास वाढला? ही पांढरी पावडर वापरा, उंदीर 2 मिनिटांत घराबाहेर जातील

घरातील उंदीर सहजपणे घालवण्यासाठी एक भन्नाट उपाय मिळाला आहे. घरी फक्त ही पांढरी पावडर बनवा तेही विना खर्च त्यामुळे उंदीर नक्कीच घरातून निघून जातील. काय आहे ती पांढरी पावडर आणि कशी बनवायची ते जाणून घेऊयात.

उंदरांचा त्रास वाढला? ही पांढरी पावडर वापरा, उंदीर 2 मिनिटांत घराबाहेर जातील
DIY white powder will keep mice away from your house, definitely try it
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 11, 2025 | 2:36 PM

घरात उंदीर असणे ही एक सामान्य समस्या आहे, जी केवळ त्रासदायकच नाही तर अनेक आजारांना कारणीभूतही ठरू शकते. एवढेच नाही तर ते अन्नपदार्थांची नासाडी करण्यासोबतच घरातील कपडे, किंवा कोणतेही वीजेचे कनेक्शनचं नुकसान करतात. घरातील वस्तू खराब करून ते खूप नुकसान करतात. पण काहीवेळेला अनेक प्रयत्न करूनही उंदीर घराबाहेर जात नाही. मग अशावेळी पेस्ट कंट्रोलसारख्या महागड्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो.

ही पांढरी पावडर उंदरांना पळवून लावते

पण यावर एका YouTuberने परिणामकारक असा घरगुती उपाय सुचवला आहे. ही पद्धत केवळ उंदीरांना दूर करण्यासाठी प्रभावी नाही, तर त्यात वापरलेले सर्व साहित्य घरात सहज मिळून जाते त्यामुळे त्यासाठी एक्स्ट्रा असा कोणताही खर्च करण्याची आवश्यकता नाही. तसेत त्यात वापरले जाणारे साहित्य हे असुरक्षित नाही. या YouTuber एका पांढऱ्या पावडरचा उपाय सुचवला आहे. चला जाणून घेऊयात काय जुगाड आहे ते.

पीठ कसं बनवायचं?

दीड चमचा गव्हाचे पीठ
एक टीस्पून गरम लाल तिखट
एक रुपयाचा शाम्पू पाऊच
पाणी आणि जुना रुमाल
कापूरच्या गोळ्या

पांढऱ्या रंगाची पावडर कशी बनवायची?

एक जुनी वाटी घ्यायची आहे, जी खाण्यासाठी नंतर वापरली जाणार नाही. त्यात गव्हाचे पीठ आणि लाल तिखट घाला. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही हिरव्या मिरच्या देखील वापरू शकता, या दोन्ही पावडरमध्ये पाणी घाला आणि पीठ तयार करा. पीठाची सुसंगतता डोसा बनवण्यासाठी बनवलेल्या पीठासारखी असावी.

शाम्पू आणि कापूरचा वापर

या पिठात तुम्हाला एक रुपयाचा मिळणारा कोणत्याही शॅम्पूचा पाऊच मिसळवायचा आहे. त्यानंतर, रुमाल घेऊन ब्रशच्या मदतीने त्या संपूर्ण रुमालावर पिठ लावायचं आहे. आता तुम्हाला पिठात कापडावर कुस्करून कापराची पावरडही पसरवायची आहे. कारण उंदरांना कापूरचा वास अजिबात आवडत नाही. अशी ती पावडर तयार करायची आहे.

कसे वापरायचे?

आता हे पावडरने बनवलेलं कापड अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्हाला उंदरांची जास्त हालचाल दिसते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कापडाचे छोटे तुकडे करून घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात ठेवू शकता.त्या पावडरमध्ये मिसळलेल्या लाल तिखट किंवा मिरच्या, कापूर आणि शाम्पूचा तीव्र वास उंदरांना अस्वस्थ करतो आणि त्यांना त्या ठिकाणाहून पळून जाण्यास भाग पाडतो. उंदीर हे वास सहन करू शकत नाहीत आणि थोड्याच वेळात ते ठिकाण सोडून जातात.

या गोष्टी लक्षात ठेवा

चांगली गोष्ट म्हणजे हा उपाय उंदरांना मारत नाही, तर त्यांना घराबाहेर हाकलून लावतो. त्यामुळे मेलेले उंदीर स्वच्छ करण्याची समस्या येणार नाही. तुम्ही दर काही दिवसांनी नवीन कपडे तयार करून ठेवू शकता. जेणेकरून उंदीर परत येऊ शकणार नाहीत. तथापि, उंदीर हाकलण्यासोबतच घराच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अन्नपदार्थ उघडे ठेवू नका आणि घराच्या कोपऱ्यात कचरा साचू देऊ नका. जेणेकरून अन्नाच्या वासाने उंदीर येणार नाही.