बदामांसोबत ‘या’ गोष्टी चुकूनही खाऊ नका? आरोग्यासाठी असतात घातक

बदाम हे आरोग्यासाठी एक सुपरफूड मानले जाते. बदामामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स ऊर्जा वाढविण्यास आणि रोगांचा धोका कमी करण्यास मदत करतात. पण तुम्ही जर बदामासोबत या पदार्थांचे सेवन करत असाल तर तुमच्या आरोग्यास ते हानिकारक ठरू शकते.

बदामांसोबत या गोष्टी चुकूनही खाऊ नका? आरोग्यासाठी असतात घातक
| Edited By: | Updated on: Apr 21, 2025 | 9:39 PM

बदाम हे एक सुपरफूड मानले जाते कारण त्यात प्रथिने, फायबर, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच तुम्ही जर दररोज बदाम खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण करण्यासोबतच तुमच्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका देखील कमी होतो. तसेच तुम्ही जर दररोज बदाम खाल्ले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.

आहारतज्ज्ञांच्या मते, काही गोष्टी अशा आहेत ज्या बदामांसोबत खाल्ल्यास शरीराला फायदा होत नाही तर नुकसान होऊ शकते. बदामांसोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

नमकीन स्नॅक्स

बदामाचे सेवन केल्याने यात असलेले नैसर्गिक फॅट्स आणि पोषक घटक शरीराला अनेक फायदे मिळतात. पण बदाम खात असताना जर तुम्ही चिप्स, नमकीन किंवा तळलेल्या पदार्थांसारख्या मीठयुक्त स्नॅक्स खाल्ले तर हे मिश्रण आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जास्त मीठ रक्तदाब वाढवू शकते आणि शरीराला बदामाचे पौष्टिक फायदे कमी मिळू शकते.

कॅफिन असलेल्या गोष्टी

बदामांमध्ये मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात, जी शरीराला ऊर्जा प्रदान करतात. यासोबतच तुम्ही जेव्हा कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करतात तेव्हा त्यामध्ये असलेले कॅफिन मज्जासंस्थेला उत्तेजित करते. अशातच तुम्ही जेव्हा बदामांसोबत जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन करता तेव्हा झोपेचा त्रास, चिडचिड आणि हृदय गतीमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते. हे मिश्रण विशेषतः रात्रीच्या वेळी टाळावे.

जास्त साखरेचे पदार्थ

बदाम हे एक आरोग्यदायी स्नॅक आहे, परंतु तुम्ही बदाम गोड, चॉकलेट किंवा साखरेच्या पदार्थांसोबत खाल्ले तर ते रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवू शकते. मधुमेही रुग्णांसाठी हे धोकादायक ठरू शकते.

लिंबूवर्गीय फळे

जर बदाम लिंबू, संत्री, द्राक्षे यांसारख्या आंबट फळांसोबत बदाम खाल्ले तर अपचन होऊ शकते. लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक आम्ल असते आणि बदामांमध्ये फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात. या मिश्रणामुळे पोट फुगणे, पोटदुखी आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशावेळेस बदाम खाण्यापूर्वी किंवा नंतर आंबट फळांचे सेवन करू नका.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)