
लहान मुलांचे मन खूप नाजूक असते. त्यामुळे कधीकधी कठोरपणा देखील त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करतो. आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि स्पर्धेच्या युगात मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण प्रत्येक छोटी गोष्ट मुलांच्या मनावर परिणाम करते. कारण यात आता मुलांवर पुढे जाण्याचा दबावही पूर्वीच्या तुलनेत खूप वाढला आहे, त्यामुळे पालकत्वाच्या पद्धती बदलणे स्वाभाविक आहे. आताच्या या स्पर्धेच्या जगात मुलाला प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांना मारहाण करणे किंवा त्यांच्याशी खूप कठोर वागणे टाळले पाहिजे. जर तुम्ही चुकीच्या वेळी किंवा परिस्थितीत ओरडले तर मुलांच्या शिकण्याच्या कौशल्यावर वाईट परिणाम होतो. तर आजच्या या लेखात आपण जाणून घेऊ की कोणत्या तीन वेळी मुलांना ओरडू किंवा फटकारू नयेत…
तुमची मुलं जेव्हा अभ्यासाच्या किंवा इतर कोणत्या तणावात असतील तर त्या चुकीच्या वेळी ओरडल्याने त्यांचा शारीरिक विकासच थांबत नाही तर त्यांच्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे मुले चिडचिडे होतात आणि त्यांमुळे मुलं तुमच्या कडे कोणतीच गोष्ट शेअर करत नाही, त्यामुळे मुलांना ताण आणि चिंता यासारख्या समस्यांनी वेढले जातात.
1. सकाळी उठल्यावर ओरडू नये
सकाळी उठल्यानंतर कधीकधी मोठयांना देखील असे होते की सकाळी सकाळी कोणाशी बोलू नये. कारण सकाळची सुरूवात आपल्या मनावर व मुडवर परिणाम करतो. म्हणून सकाळची वेळ शांतता आणि आनंदाने भरलेली असावी. सकाळी, लोकं शाळेच्या घाईत मुलांना जबरदस्तीने उठवतात आणि या वेळी बरेचदा त्यांच्यावर चिडतात, परंतु ही वेळ सर्वात महत्वाची असते, जेव्हा तुम्ही मुलांशी प्रेमाने वागता.
शाळेतून परत आल्यावर ओरडू नये
जेव्हा मूले शाळेतून परत येतात तेव्हा अनेक पालकांना त्यांना लगेच प्रश्न विचारण्याची सवय असते. जसे की आज शाळेत काय शिकला, अभ्यास किती दिला हे विचारत असतात. परंतु असे प्रश्न किंवा फटकारणे मुलांच्या मनावर त्रास होऊ शकतो, कारण शाळेतून येतानामुलं खूप थकलेले असतात. शाळेतून परत आल्यानंतर, कपडे बदलल्यानंतर मुलाला हेल्दी अन्न आणि पिण्यासाठी पाणी द्यावे.
रात्री झोपताना ओरडू नका
झोप ही मुलाच्या विकासात खूप मोठी भूमिका बजावते. जर तुमचे मूल रात्री उशिरापर्यंत जागे राहिले किंवा झोपताना त्यांच्यावर ओरडले तर त्याचा शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, मुलाला नेहमी प्रेमाने झोपवावे आणि यावेळी त्यांना कधीही फटकारण्याची चूक करू नये.