AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या विजेच्या मीटरवर अशी खून दिसते का, बिल वाढेल की कमी होईल? महत्त्वाची गोष्ट घ्या जाणून…

विजेच्या मीटरबद्दल काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला देखील माहिती होत नाही. अनेकांच्या मीटवर अशी एक खून असते... ज्यामुळे विज बिल वाढतं की कमी होतं? याबद्दल माहिती नसतं, त्यामुळे ती खून नक्की कोणती आहे आणि त्याचा अर्थ काय होतो.

तुमच्या विजेच्या मीटरवर अशी खून दिसते का, बिल वाढेल की कमी होईल? महत्त्वाची गोष्ट घ्या जाणून...
| Updated on: Sep 07, 2026 | 10:51 AM
Share

आज प्रत्येकाच्या घरात स्मार्ट मीटर बसवलेलं असतं. पण मीटरवर असलेल्या काही चिन्हांचा अर्थ आपल्याला कळत नाही. त्यामुळे अशा चिन्हांमुळे आपल्याला बिल कमी येकं की जास्त येतं याबद्दल काही कळत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला तुमच्या मीटरच्या डिस्प्लेवर वेगवेगळ्या प्रकारचे छोटे सिग्नल दिसतील. त्यावर अर्थिंगसारखी दिसणारी एक खूणही असू शकते. पण त्याचा अर्थ नेमका काय असेल, याबद्दल कोणाला कदाचित माहिती देखील नसेल. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर असा दावा केला जातो की, ही खूण दिसल्यास विजेचे बिल कमी येईल, पण हे खरं नाही, त्यामुळे जाणून घ्या यामागे नेमका अर्थ कोणता आहे.

अर्थिंग प्रणाली म्हणजे काय? हे कदाचित सर्वांना माहिती असेल. विद्युत सुरक्षेसाठी अर्थिंग एक महत्त्वाची भूमिका बजावतो. जर काही कारणास्तव विद्युत उपकरणामध्ये विद्युत प्रवाह गळला, तर अर्थिंग तो सुरक्षितपणे जमिनीकडे वाहून नेण्यास मदत करते. त्यामुळे, अर्थिंगचा मुख्य उद्देश विद्युत प्रवाहापासून संरक्षण देणं हा आहे, वीज बिल कमी करणं हा नाही.

मीटरवर ते चिन्ह का दिसतं असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. डिजिटल आणि स्मार्ट मीटर्स वीजपुरवठा, लोड आणि मीटरची स्थिती यासह विविध तांत्रिक माहितीचं संकेत हे चिन्ह दर्शवतात. काही मीटर्स अर्थिंगशी संबंधित संकेत देखील दर्शवू शकतात. पण, या चिन्हाचा अर्थ प्रत्येक कंपनी आणि मॉडेलसाठी सारखाच असेल असं नाही.

अर्थिंगमुळे विजेचे बिल कमी होते का? असा देखील प्रश्न अनेकांना सतावत असतो. मीटरवरील अर्थिंगच्या चिन्हामुळे विजेचं बिल कमी होत नाही. बिल मुख्यत्वे तुमच्या घरात वापरल्या जाणाऱ्या विजेच्या युनिटवर आधारित असते. एसी, गिझर, हीटर आणि इतर जास्त वीज वापरणारी उपकरणे जास्त वेळ चालवल्याने विजेचा वापर आणि बिल दोन्ही वाढू शकतात. यामुळे उन्हाळ्यात बिस जास्त येतं.

जर अर्थिंग योग्य नसेल आणि कोणत्याही उपकरणातून विद्युत प्रवाह गळत असेल, तर विजेचा धक्का लागण्याचा धोका वाढू शकतो. योग्य अर्थिंग खूप महत्त्वाचं आहे, विशेषतः फ्रिज, वॉशिंग मशीन, गिझर यांसारख्या धातूच्या बॉडी असलेल्या उपकरणांमध्ये. त्यामुळे, घरातील इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये अर्थिंगकडे दुर्लक्ष करू नये.

एखादे चिन्ह दिसल्यास काय केलं पाहिजे, जर मीटरवर फक्त ‘अर्थिंग’चं चिन्ह दिसत असेल आणि मीटर व्यवस्थित काम करत असेल, तर घाबरण्याची गरज नाही. परंतु, जर त्यासोबत कोणताही एरर कोड, चेतावणी किंवा असामान्य सिग्नल दिसत असेल, तर स्वतःहून मीटर उघडण्याचा प्रयत्न करू नका. वीज विभागाकडून किंवा पात्र इलेक्ट्रिशियनकडून ते तपासून घेणं अधिक सुरक्षित आहे. विजेचे बिल कमी करण्यासाठी, विजेचा वापर कमी करणं आवश्यक आहे.

Follow Us
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?