Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!

| Updated on: Dec 28, 2020 | 12:52 PM

हिवाळ्याच्या दिवसांत हंगामी संक्रमण टाळण्यासाठी आवळा रसाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!
आवळा
Follow us on

मुंबई : आवळ्याला हिवाळ्यातील एक सुपर फूड मानले जातो. आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आवळा चयापचय क्रिया सुरळीत करण्यात मदत करतो. तसेच, कोलेस्ट्रोल कमी करण्यास देखील मदत करतो. हिवाळ्याच्या दिवसांत आवळ्याच्या सेवनाने सर्दी, ताप आणि हंगामी संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते. आवळा व्हिटामिन बी 5, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे. आज आपण आवळा रसांच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे या काळात तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकते (Drink Amla juice during winter as Immunity Booster).

हिवाळ्याच्या दिवसांत हंगामी संक्रमण टाळण्यासाठी आवळा रसाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. आवळ्याचा रस बनवणे खूप सोपे आहे. जर, तुम्हाला दररोज आवळा खायला कंटाळा आला असेल तर तुम्ही आवळा रस पिऊ शकता. जर, तुम्ही आवळायुक्त चहा प्यायला तर, तुम्हाला तुमच्या आरोग्याची चिंता उरणार नाही, तसेच कॅन्सरसारख्या आजारांपासूनसुद्धा संरक्षण मिळेल.

आवळा-जिऱ्याचा रस

आवळ्यामध्ये तुम्ही जिरेपूड टाकून हा रस पिऊ शकता. जिरे आपल्या आवळा रसाची चव आणि स्वाद वाढवण्याचे काम करेल. शिवाय चयापाचयाला मदत करेल.

आवळा-जिऱ्याचा रस बनवण्याची कृती :

आवळा-जिऱ्याचा रस बनवण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे तुम्ही एक चमचा जिरे एक रात्र आधी किंवा सकाळी पाण्यात भिजवून ठेवून, काही काळाने गाळून आवळ्याच्या रसामध्ये ते जिरे वाटून त्याचे सेवन करू शकता. दुसरे म्हणजे कप आवळ्याच्या रसात थोडाशी जिरेपूड टाकून तो पिऊ शकता (Drink Amla juice during winter as Immunity Booster).

 

आवळा-आले रस

आले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आल्याचा वापर घश्याच्या समस्या, सर्दी आणि खोकला या समस्या दूर करण्यासाठी होतो.

आवळा-आले रस बनवण्याची कृती :

एक ते दोन आवळे कापून, त्यात एक चमचा आल्याचा रस मिसळा. त्यात 3 ते 4 पुदीना पाने आणि कोमट पाणी टाकून वाटून घ्या. यानंतर या रसात काळे मीठ आणि चाट मसाला घालून सेवन करा.

 

आवळ्या चहा

हिवाळ्याच्या दिवसांत गरम चहा प्यावा असे सर्वांनाच वाटत असते. अशावेळी चहात आवळ्याचा वापर करुन पाहा. एक आवळा, आले आणि दालचिनी टाकून हा चहा बनवू शकता. या सर्व गोष्टी आपल्या शरीराला आतून उबदार ठेवतील.

आवळ्या चहा बनवण्याची कृती :

चहा बनवण्याच्या भांड्यात अर्धा चमचा किसलेले आले, अर्धा तुकडा दालचिनी, 1 चिरलेला आवळा आणि थोडासे पाणी घालून साधारण 10 मिनिटे उकळवा. या चहात चवीनुसार किंवा अर्धा चमचा गूळ घालू शकता.

(Drink Amla juice during winter as Immunity Booster)

हेही वाचा :