corona | कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रामबाण उपाय ‘काढा’,  जाणून घ्या काढा घेण्याचे फायदे 

| Updated on: Jan 13, 2022 | 1:00 PM

Health care गेल्या दोन वर्षात कोरोनाने सगळ्यांना वेढीस धरलं आहे. कोरोना ही महामारी आल्यानंतर एक शब्द वारंवार कानावर पडतोय, तो म्हणजे इम्यूनिटी. जर तुमची इम्यूनिटी मजबूत असेल तर तुम्ही कुठल्याही आजाराचा सामना करु शकतात. पूर्वी आजी सांगायची सर्दी खोकला झाला तर अरे काढा घ्या. पण आपण ते काही फार सिरीयस घ्यायचो नाही. पण या कोरोनामुळे आज अनेकांच्या घरात काढा बनवला जातोय आणि तो घेतलाही जातोय. काढा घेण्याचे जसे फायदे आहेत तसेच काही नुकसान पण आहेत.

corona | कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रामबाण उपाय काढा,  जाणून घ्या काढा घेण्याचे फायदे 
kadha
Follow us on

मुंबई : कोरोनाशी लढण्यासाठी काढा हे सगळ्यात महत्त्वाचं हत्यार आहे, असा सगळ्यांचा समज आहे. त्यामुळे अनेक घरात काढा बनवला जातोय. काढ्यामुळे आपली इम्यूनिटी वाढते. आणि आपल्याला आजाराशी लढण्यासाठी बळ मिळतो. काढा बनवताना अनेक जण एक चूक करतात ती म्हणजे पाणी हवं तेवढं उकळत नाही. एका भांड्यात कमी पाणी घ्या मग त्यात काळी मिरे, लवंग, विलायची, दालचिनी आणि अदरक आदी गोष्टी टाका. मग हे पाणी अर्ध होईपर्यंत उकळा.

काढ्यामुळे होते इम्यूनिटी मजबूत
हो, घरगुती काढ्यामुळे आपली इम्यूनिटी मजबूत होण्यासाठी मदत होते. अगदी पूर्वीपासून आजी आपल्याला सर्दी खोकला झाला की पहिले काढा घेण्याची सल्ला द्यायची. मग आजी किंवा आई घरातील रोजच्या वापरातील अदरक, दालचिनी, काळीमिरे आदी गोष्टी घेऊन काढा केला जायचा. कोरोनाचा महामारीत हा काढा परत नव्याने समोर आला आहे. आज प्रत्येक घरात काढा बनतोय असं म्हणं वावगं ठरणार नाही. काढा तयार करण्याची एक पद्धत असते. काढा हा जास्त घट्ट पण नसावा ना पातळ पण नसावा. तो संतुलित असल्यास त्याचा फायदा होतो. ज्या व्यक्तीची पचनशक्ती कमजोर असते, त्याला हा काढा बाधू शकतो. त्याला तोंड येऊ शकतं, पोट खराब होणे, एसिडिटीचा त्रास किंवा सतत लघवीला जाण्याची समस्या होऊ शकते.
काढा हा रोज घ्यायला नको.

हो, काढा जर आरोग्यासाठी उत्तम औषधं आहे तर ते रोज घ्यायला हवं ना. तर नाही काढा रोज घ्यायचा नाही. काढा बनविण्यासाठी वापरण्यात येणारे सगळे पदार्थ हे गरम असतात. त्यामुळे रोज काढा घेतल्याने तुमच्या शरीराची उष्णता वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला अनेक त्रासाला समोरे जावं लागेल. महिलांना खास करुन पिरेडच्या दिवसात हा काढा जास्त उष्ण पडतो. त्यामुळे त्यांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून काढ्याचं सेवन मध्येमध्ये काही काळासाठी बंद केलं पाहिजे. तसंच प्रेग्नेंट महिलांनी तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काढा घेऊ नये.

1. तुळशीचा काढा
साहित्य – 100 ग्रम तुळशीची पाने
10 ग्राम दालचीनी
10 ग्राम कडीपत्ता
50 ग्राम बडीशेप
15 ग्राम छोटी इलायची
10 ग्राम कालीमिरे
कृती – वरील सर्व पदार्थ एकत्र मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. मग एका भांड्यात दोन कप पाणी उकळून घ्या. त्यात अर्धा चमचा मिश्रण घाला. आणि अजून थोडावेळ पाणी अर्ध होईपर्यंत उकळू द्या. तुमचा तुळशीचा काढा तयार.
टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा

संबंधित बातम्या : 

हिवाळ्यातील आरोग्य : बंद नाकाच्या समस्येबाबत अशी घ्या काळजी…

पिझ्झा, बर्गर खाताय तर सावधान; फास्ट फूडमुळे रोगप्रतिकारक शक्तीच शरीराला पोहोचवतीये हानी