दररोज आहारात घ्या टोमॅटो सूप, होतील अनेक फायदे

| Updated on: Apr 23, 2021 | 9:30 AM

टोमॅटो हे प्रत्येक स्वयंपाक घरात वापरले जाते. टोमॅटो खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर देखील आहे.

दररोज आहारात घ्या टोमॅटो सूप, होतील अनेक फायदे
टोमॅटो सूप
Follow us on

मुंबई : टोमॅटो हे प्रत्येक स्वयंपाक घरात वापरले जाते. टोमॅटो खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर देखील आहे. टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. (Drinking tomato soup is beneficial for health)

सध्याच्या कोरोना काळात तर आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे. यासाठी आपण आहारात दररोज टोमॅटोचा सूप घेतला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. टोमॅटोची गणना नेहमीच स्वादिष्ट भाज्यांमध्ये केली जाते. टोमॅटो स्वादिष्ट असण्याबरोबरच आपल्याला शरीराला निरोगी ठेवण्यास देखील उपयुक्त आहे. टोमॅटोमध्ये व्हिटामिन ए, बी, सी आणि सोडियम, सल्फर, जस्त, पोटॅशियम यासारखी खनिज घटक देखील आढळतात असतात. टोमॅटो सूपमध्ये हलके तळलेले ब्राऊन ब्रेडचे तुकदे टाकून, तुम्ही सूपची चव आणखी वाढवू शकता.

टोमॅटो सूप आपल्या शरीरास आतून उबदार ठेवते. तसेच वजन कमी करून, हृदय निरोगी ठेवण्याचे काम देखील करते. टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. तसंच टोमॅटो कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक यासारख्या तत्त्वांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर अजून प्रभावकारक ठरतो.

टोमॅटोमध्ये कर्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असते. यामुळे हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे. यामुळे दररोज टोमॅटो खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात, जे कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या गंभीर रोगांपासून बचाव करण्यासाठी सहायक असतात. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

(Drinking tomato soup is beneficial for health)