सलाड खाणे आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!

| Updated on: Jun 08, 2021 | 8:00 AM

सलाड खाणं हे शरीरासाठी आरोग्यदायी आहे. त्याचा वजन कमी करण्यासाठी देखील उपयोग होतो. मात्र, सलाडमध्ये जास्तीत-जास्त हिरव्या भाज्या या असल्या पाहिजेत.

सलाड खाणे आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
आहार
Follow us on

मुंबई : सलाड खाणं हे शरीरासाठी आरोग्यदायी आहे. त्याचा वजन कमी करण्यासाठी देखील उपयोग होतो. मात्र, सलाडमध्ये जास्तीत-जास्त हिरव्या भाज्या या असल्या पाहिजेत. सलाडमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्रिममध्ये फॅट असतात. यामुळे सलाडमध्ये शक्यतो क्रिम वापरणे टाळाच. अनेक लोक सलाडमध्ये सॉस आणि ग्रेव्हीचा उपयोग करतात. मात्र, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट आणि कॅलरी असतात. (Eat salad in the diet to lose weight)

सलाड खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. विशेष म्हणजे सलाड खाल्ल्याने आपले वजन झटपट कमी होते. सलाड तयार करण्यासाठी जास्तीत-जास्त हिरव्या भाज्यांचा वापर केला पाहिजे. फायबर्सने परिपूर्ण असे सलाड खाल्ल्याने पोटातील जमा विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातात त्यामुळे आतडी आतून स्वच्छ होऊन, बद्धकोष्टता दूर होते आणि पचनासंबधित सर्व विकारांना आळा बसतो.

यातील भाज्यांमध्ये सर्व प्रकारची जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असल्यामुळे, शरीरातील जीवनसत्वांचा अभाव सलाड खाल्ल्याने दूर होतो. सलाडमध्ये काकडी, टोमॅटो, कोबी, कांदा याचा जास्तीत वापर केला पाहिजे. सलाडमध्ये चवीपुरतेच मीठ टाकावे. जास्त मीठ आणि तिखट टाकणे काळा. सलाड खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊन, हृदय रोगांपासून बचाव होतो. जेवण कमी करून सलाडचे प्रमाण वाढवल्याने पोटही भरते.

त्याचबरोबर वजनही वाढत नाही. आहारतज्ज्ञांच्या मते, सलाडमध्ये कधीही मीठ घालू नये. जर तुम्हाला त्यावर मीठ टाकून खाणे आवडत, असेल तर त्यासोबत सैंधव मीठ किंवा रॉक सॉल्ट वापरण्याचा प्रयत्न करा. जास्तवेळ आधीच कापून ठेवेलेल सलाड सेवन करू नये. वातावरणात बॅक्टेरिया खूप सक्रिय असतात. म्हणूनच, सलाड अधिक वेळ उघडे ठेऊ नये.  रात्रीच्या वेळी सलाड खाणे टाळावे. रात्री काकडी खाऊ नये.

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Eat salad in the diet to lose weight)