AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेले ‘या’ 5 प्रकारच्या सॅलड्सचे करा सेवन

वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश केला पाहिजे जे कमी कॅलरीयुक्त असूनही भरपूर पोषण देतात. यासाठी सॅलड हा एक चांगला पर्याय आहे. तुमच्या आहारात विविध प्रकारच्या सॅलडचा समावेश करून तुम्ही वजन कमी करु शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण काही सॅलडच्या रेसिपी जाणून घेऊयात.

वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेले 'या' 5 प्रकारच्या सॅलड्सचे करा सेवन
वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेले 'या' 5 प्रकारच्या सॅलड्सचे करा सेवनImage Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Mar 21, 2026 | 10:34 PM
Share

बदलत्या जीवशैलीमुळे अनेकांचे वजन वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रोजच्या शारीरिक हालचालींव्यतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे. जर या दोन गोष्टी योग्यरित्या फॉलो केल्या तर वजन लवकर कमी करता येते. वजन कमी करण्यात प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावतात, मात्र कॅलरीचे सेवन मर्यादित ठेवणे किंवा आपले शरीर जितक्या कॅलरी खर्च करू शकते तितक्याच कॅलरी घेणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी सॅलड्स विशेषतः फायदेशीर ठरतात. कारण त्यांमध्ये कॅलरी कमी असून फायबर भरपूर असते. तसेच सॅलडच्या सेवनाने विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील शरीराला मिळत असतात. तर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर आजच्या लेखात आपण अशा पाच प्रकारच्या सॅलड्सची रेसिपी आणि वजन कमी करण्यास कसे उपयुक्त ठरतात ते जाणून घेऊयात.

सॅलडचा फायदा हा आहे की ते बनवायला जास्त वेळ लागत नाही. तसेच सॅलडमध्ये भरपूर पाणीही असते, ज्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. चला वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

मोड आलेल्या कडधान्यांचे सॅलड

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल, तर तुमच्या आहारात मोड आलेल्या धान्यांच्या सॅलडचा समावेश करा. मोड आलेले मूग, मोड आलेले काळे चणे आणि शेंगदाणे एकत्र करा. त्यात टोमॅटो, कांदे आणि काकडी यांसारख्या भाज्या बारीक चिरुन मिक्स करा. आता यामध्ये थोडा लिंबाचा रस आणि काळे मीठ टाकून हे तुमचे प्रथिनयुक्त सॅलड तयार होईल.

ग्रीन सॅलड बनवा

ग्रीन सॅलड बनवण्यासाठी यामध्ये काकडी, मुळा, टोमॅटो, लेट्यूस, गाजर, ब्रोकोली हे सर्व बारीक चिरुन घ्या. त्यात पुदिन्याची पाने देखील मिक्स करा. लिंबाचा रस, काळी मिरी आणि काळे मीठ टाकूल मिश्रण एकत्र मिक्स करा. आता या सॅलडवर थोडे ऑलिव्ह तेल टाका. अशा प्रकारे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अनेक अँटिऑक्सिडंट्स असा पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेला एक चविष्ट ग्रीन सॅलड आहारात समावेश करा.

उच्च प्रथिनयुक्त सॅलड

तुम्ही पनीर किंवा टोफू यापासून देखील सॅलड बनवू शकता. पनीरमध्ये फॅटचे प्रमाण थोडे जास्त असते, तर टोफूमध्ये फॅट कमी असते आणि ते प्रथिनांनीही भरपूर असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार दोन्हीपैकी एक निवडू शकता. सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडे ऑलिव्ह तेल पसरवा. त्यात 100 ग्रॅम पनीर किंवा टोफू परतवून घ्या. ते एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात मूग, चणे किंवा क्विनोआ यांसारखी मोड आलेली धान्ये टाका. त्यात काही चिरलेल्या भाज्या आणि लिंबू-मिरचीचे ड्रेसिंग टाकून चविष्ट सॅलडचा आस्वाद घ्या.

ब्रोकोली-चणे सॅलड

वजन कमी करण्यासाठी तुम्ही ब्रोकोली आणि चण्यांचे सॅलड बनवू शकता. चणे उकडून घ्या आणि त्यात ब्रोकोली हलकी वाफवून घ्या. कांदा बारीक चिरा. तसेच शिमला मिरची आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. सर्व बारीक चिरलेल्या भाज्या एकत्र मिक्स करा, त्यावर थोडे ऑलिव्ह तेल टाका आणि मग मीठ व काळी मिरी यांसारखे नेहमीचे मसाले टाका. फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांनी समृद्ध असलेले सॅलड तयार आहे.

दह्यासोबत प्रथिनयुक्त सॅलड

तुम्हाला जर दुपारच्या जेवणात सॅलडचा समावेश करायचा असेल, तर प्रथिनयुक्त योगर्ट सॅलड उत्तम आहे. सकाळी दही एका कापडात बांधून त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका. आता हे सॅलड बनवण्यासाठी त्यात प्रथम, काकडी, गाजर यांसारख्या काही भाज्या आणि लेट्यूसची काही पाने लांब चिरून घ्या. आता एका भांड्यात दही फेटून घ्या. त्यात चिरलेल्या भाज्या आणि मोड आलेले मुग मिक्स करा. तुम्ही 50 ग्रॅम पनीर देखील त्यात मिक्स करू शकता. सैंधव मीठ आणि बारीक पुड केलेली काळी मिरी टाकून चवीनुसार मसाला टाका. तुमचे चविष्ट सॅलड तयार आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या...
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....