
भारतातील बहुतांशी लोक मद्यपान करतात. काही लोक पार्टीत किंवा मित्रांसोबत दारू पितात. काही लोक जास्त प्रमाणात दारू पितात, त्यामुळे त्यांच्या आरोग्य खराब होतो. अनेकांना कमी दारू प्यायली तरी जास्त नशा येते. मात्र आज आम्ही तुम्हाला दारू पिण्यापूर्वी कोणते पदार्थ खाल्ल्याने नशा कमी होते याची माहिती सांगणार आहोत. दारू पिल्यानंतर तुम्हाला होणारा त्रास कमी होईल. याबाबत आहारज्ज्ञ डॉ. दीपाली शर्मा यांनी एका वृत्त वाहिनीला माहिती दिली आहे.
डॉ. दीपाली शर्मा यांनी सांगितले की, अल्कोहोलचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. मात्र योग्य अन्न आधीच खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात होणारी नशा टाळता येते. यामुळे यामुळे पोटावर होणारा परिणाम कमी होतो आणि हँगओव्हरही कमी होतो. दारू पिण्यापूर्वी प्रोटीन आणि फायबर असलेले अन्न खाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
डॉ. दीपाली शर्मा यांनी सांगितले की, रिकाम्या पोटी कधीही दारू पिऊ नका. यामुळे रक्तप्रवाहात अल्कोहोल जलद शोशले जाते आणइ त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते, यामुळे उलट्या, स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात. पोटात अन्न असल्यास अल्कोहोल रक्तप्रवाहात हळूहळू शोषले जाते, ज्यामुळे जास्त शारीरिक हाणी होत नाही.
(टीप – टीव्ही 9 मराठी कोणत्याही प्रकारच्या मद्यपानाचे समर्थन करत नाही. वरील उपाय हे केवळ माहितीसाठी आहे. हे उपाय करण्यापूर्वी तुमच्या आहार तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्यावा. )