‘या’ भाज्या शिजवण्याची काहीही गरज नाही, थेट खाणं ठरतील आरोग्यासाठी लाभदायक

अनेकांना भाज्या खायला आवडत नाहीत, पण भाज्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात. पण काही भाज्या अशा देखील अशा देखील आहेत, ज्या शिजवण्याची काहीही गरज नाही... थेट खाणंच आरोग्यासाठी लाभदायक ठरतील.

या भाज्या शिजवण्याची काहीही गरज नाही, थेट खाणं ठरतील आरोग्यासाठी लाभदायक
| Updated on: May 03, 2026 | 3:46 PM

भाज्या खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. पण अनेकांना भाज्या खायला अवडत नाही. पण काही भाज्या अशा देखील आहेत, ज्या तुम्ही शिजवल्याशिवाय देखील खाऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे, पदार्थ शिजवून खाण्याऐवजी कच्चे खाल्ल्यास आपल्या शरीराला त्यांचे पूर्ण फायदे मिळतात. हे माहीत नसतानाच अनेक लोक ते पदार्थ शिजवतात. मात्र, उष्णतेमुळे त्यांमधील काही जीवनसत्त्वे आणि खनिजे नष्ट होतात. त्यामुळे जाणून घ्या की कोणते पदार्थ न शिजवता थेट खाल्ले जाऊ शकतात.

गाजर: गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. आपले शरीर त्याचं रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये करतं, जे दृष्टी, त्वचेचं आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी खूप उपयुक्त आहे. गाजर शिजवल्याने त्यातील बीटा-कॅरोटीनचे प्रमाण काही प्रमाणात कमी होऊ शकते. म्हणून, शक्यतोवर ते कच्चेच खाण्याचा प्रयत्न करा.

पालक: पालकामध्ये लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. मात्र, शिजवल्याने त्यातील व्हिटॅमिन सीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते. कच्च्या पालकामध्ये पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असलेले अँटीऑक्सिडंट ल्युटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे, कच्चा पालक खाणं अधिक फायदेशीर ठरते.

ब्रोकोली: ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि सल्फोराफेन नावाचे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. शिजवल्यावर, उष्णतेमुळे त्यातील व्हिटॅमिन सी तर नष्ट होतेच, पण त्याचबरोबर कर्करोगविरोधी गुणधर्म असलेल्या सल्फोराफेनचे प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी होते. त्यामुळे, सॅलडमध्ये कच्ची ब्रोकोली खाणे आरोग्यासाठी खूप चांगले असते.

ढोबळी मिरची: यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ते त्वचेच्या आरोग्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. परंतु, ढोबळी मिरची शिजवल्याने त्यातील व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी होते. ती कच्ची खाल्ल्याने शरीरासाठी फायदेशीर असलेले संपूर्ण पोषक घटक तसेच कॅरोटीनॉइड्स मिळतात.

टोमॅटो: टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि लायकोपीन असते. खरे तर, टोमॅटो शिजवल्याने लायकोपीनची उपलब्धता वाढते, परंतु व्हिटॅमिन सीची उपलब्धता कमी होते. त्यामुळे, आपल्या आहारात शिजवलेल्या आणि कच्च्या दोन्ही प्रकारच्या टोमॅटोचा समावेश केल्यास आपल्याला सर्व प्रकारचे फायदे मिळू शकतात.

Follow Us