AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harmful | स्मार्टफोनच्या अति वापरामुळे खुंटतो मुलांच्या मेंदूचा विकास, भविष्यात होऊ शकतात अनेक मोठे तोटे!

आजकाल, आई वडील स्वतःच्या सोयीसाठी आपल्या मुलांचा मोबाईल टेकवतात. यामुळे लहान मुलांना मोबाईलची अशी सवय लागली आहे की, ते त्यावर तासन् तास गेम खेळत राहतात.

Harmful | स्मार्टफोनच्या अति वापरामुळे खुंटतो मुलांच्या मेंदूचा विकास, भविष्यात होऊ शकतात अनेक मोठे तोटे!
स्मार्टफोनच्या अति वापरामुळे खुंटतो मुलांच्या मेंदूचा विकास
| Updated on: Feb 15, 2021 | 3:03 PM
Share

मुंबई : आजकाल, आई वडील स्वतःच्या सोयीसाठी आपल्या मुलांचा मोबाईल टेकवतात. यामुळे लहान मुलांना मोबाईलची अशी सवय लागली आहे की, ते त्यावर तासन् तास गेम खेळत राहतात. जर आपल्या मुलासही मोबाईलचे असे व्यसन लागले असेल, तर त्याची ही सवय आतापासूनच मोडण्याचा प्रयत्न करा. अन्यथा भविष्यात त्याला मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो (Excess use of smartphone can stop growth of your childs brain).

अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, स्मार्टफोनच्या वापराचा परिणाम मुलांच्या मेंदूवर, तसेच त्यांच्या डोळ्यांच्या विकासावर होतो. जर 10 वर्षांपर्यंतची मुले स्मार्टफोन सतत सात तास किंवा त्याहून अधिक काळ वापरत असतील, तर त्यांच्या मेंदूचा बाह्य थर, ज्याला कॉर्टेक्स म्हणतात, तो पातळ होऊ लागते. ज्याचा त्यांच्या मेंदूच्या वाढ होण्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे मेंदूत वाढ देखील थांबू शकते.

यामुळे मेंदूत ग्रे-मॅटरची घनताही कमी होऊ शकते. स्मरणशक्ती, लक्ष, जागरूकता, विचार, भाषा आणि चैतन्य यात ग्रे मॅटर या घटकाची महत्वाची भूमिका असते. याशिवाय स्मार्टफोनच्या अति वापरामुळे मुलांच्या डोळ्यात कोरडेपणा देखील येऊ शकतो. मुले जेव्हा मोबाईलवर एखादा गेम खेळतात, तेव्हा ते बराच वेळ त्यावर टिकून राहतात. असा प्रकरणात, बर्‍याच दिवसांपासून मुलांच्या डोळ्यांची व्यवस्थित हालचाल होत नाही. यामुळे डोळ्यात कोरडेपणा, लालसरपणा आणि डोळ्यातून सतत पाणी येणे, या समस्या उद्भवू शकतात (Excess use of smartphone can stop growth of your childs brain).

‘या’ टिप्स मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त होण्यास मदत करतील!

– मुलांना मोबाईलवर खेळण्यासाठी एक निश्चित वेळ द्या. या वेळेच्या नियमाबद्दल आपण कठोर असले पाहिजे.

– मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी बोला, त्यांना कथा सांगा. क्विझ आणि मेंदूला चालना देणारे असे बरेच गेम खेळा.

– मुलांना मैदानी खेळांमध्ये व्यस्त ठेवा. यामुळे मोबाईलकडे त्यांचे लक्ष कमी होईल.

– रात्री झोपत असताना मुलांना मोबाईल देऊ नका. झोपेच्या वेळी चांगल्या गोष्टी सांगा. झोपेच्या वेळी केल्या गेलेल्या क्रियाकलापांच्या खुणा आपल्या मेंदूत प्रकाशित राहतात. यामुळे, सकाळी उठल्याबरोबर प्रथम त्याच गोष्टीकडे आपले लक्ष वेधले जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्यांच्याशी चांगल्या प्रकारे बोललात तर त्याचा सकारात्मक परिणाम होईल.

– अन्न खाताना मोबाईल पाहण्याची सवय सोडून द्या. यामुळे मुलांच्या मनात खाण्याचा विचार येत नाही आणि बर्‍याच वेळा ते गरजेपेक्षा जास्त खातात, किंवा कधीकधी व्यवस्थित खात देखील नाहीत. दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांना त्रास सहन करावा लागू शकतो.

(Excess use of smartphone can stop growth of your childs brain)

हेही वाचा :

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.