AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा नवा अवतार देशातील 36 कोटी लहान मुलांसाठी धोकादायक, वाचा कसा?

अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, याचा सर्वात मोठा धोका देशातील 15 वर्षांखालील 36 दशलक्ष मुलांना आहे. याऊनही भयकंर म्हणजे लहान मुलांसाठी अद्याप कोरोनाची लस आलेली नाही.

कोरोनाचा नवा अवतार देशातील 36 कोटी लहान मुलांसाठी धोकादायक, वाचा कसा?
यापैकी 16 टक्के रुग्णांना डोळ्याच्या दुखण्याची लक्षणं आढळली तर फक्त 5 टक्के लोकांनी आधीच डोळ्यांचा त्रास होता अशी माहिती दिली.
| Edited By: | Updated on: Dec 24, 2020 | 8:42 AM
Share

नवी दिल्ली : काही केल्या कोरोनाचा (Corona) धोका काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दिवसेंदिवस कोरोनाचं रौद्र रुप समोर येत असल्यामुळे संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा सगळ्यात मोठा परिणाम देशातील लहान मुलांवर झाल्याचं पाहायला मिळतं. देशात अद्याप कोरोनाच्या नवीन स्वरूपाची पुष्टी झालेली नाही. परंतु कोरोनाचा नवा प्रकार (new coronavirus strain) ब्रिटनमध्ये समोर आला हे नाकारता येणार नाही. यामुळे भारतासह इतर देशांनाही याचा धोका आहे. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, याचा सर्वात मोठा धोका देशातील 15 वर्षांखालील 36 दशलक्ष मुलांना आहे. याऊनही भयकंर म्हणजे लहान मुलांसाठी अद्याप कोरोनाची लस आलेली नाही. (new coronavirus strain is dangerous for children know how)

सध्याची लस 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांवर चाचण्याद्वारे तयार केली गेली आहे. अशा परिस्थितीत जर मुलांना वेगाने संसर्ग होऊ लागला तर काय होईल? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. कारण, हा नवीन प्रकारचा विषाणू 70 टक्के वेगाने पसरतो. जर कोरोना विषाणूमुळे ग्रस्त असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात पाच मिनिटं जरी राहिलात तरी एखाद्याला संसर्ग होऊ शकतो. पण जर एखाद्याने नवीन विषाणूच्या संक्रमित व्यक्तीशी अवघ्या 30 सेकंदासाठी जरी संपर्क साधला तर तो देखील विषाणूचा बळी ठरू शकतो.

या संसर्ग लहान मुलांसाठी सर्वाधिक धोक्याचा आहे. खरंतर, कोरोनाचा धोका आणखी वाढताना दिसत आहे. या संसर्गावर मात करण्यासाठी आणि याचा आणखी धोका जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ कामाला लागले आहेत. पण तरीदेखील याला आवर घालणं शक्य नाहीये. अशात लहान मुलांसाठी लसही नसल्याने त्यांना याचा मोठा धोका आहे.

आतापर्यंत, विषाणूच्या रुपामधला हा नवा अवतार 70 टक्के अधिक धोकादायक आहे. त्यातूनच मुलांमध्ये हा वेगाने पसरू शकतो. असा दावाच यूके सरकारच्या न्यू एंड इमर्जिंग रेस्पिरेटरी व्हायरस थ्रेट्स एडवायजरी समुहाने दिला आहे. यूकेच्या ज्या भागात व्हायरसचे नवीन प्रकार आढळले आहेत अशा ठिकाणी 15 वर्षाखालील मुलांची संख्या अधिक आहे.

नवा कोरोना लहान मुलांसाठी का आहे धोक्याचा?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोना विषाणूमुळे आपल्या शरीरातील पेशी मोठ्या प्रमाणात संक्रमित होतात. कोरोना विषाणूच्या संरचनेत स्पाईक प्रथिने आढळतात. प्रथिने म्हणजे मेंब्रेन प्रथिनेदेखील असतं. ENVELOPE तिसरं प्रथिने आहे. कोरोना व्हायरस आपल्या शरीरातील पेशी हायजॅक करण्यासाठी या स्पाइक प्रोटीनचा वापर करतो. स्पाइक प्रोटीनच्या मदतीने, तो आमच्या पेशींमध्ये शिरून त्यांना संक्रमित करतो.

पण आता या कोरोनाच्या या नव्या रुपाने स्वत:मध्ये धोकादायक बदल केला आहे. आता त्याने पेशींना वेगळ्या प्रकारे संक्रमित करण्यास सुरवात केली आहे. तो किती धोकादायक आहे आणि याचा शरीरावर काय परिणाम होतो याचा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. (new coronavirus strain is dangerous for children know how)

संबंधित बातम्या :

केवळ मास्कमुळे कोरोनापासून बचाव अशक्य, नव्या संशोधनाने भीती वाढली!

कोरोनाच्या संकटात आणखी एक धोका, अमेरिकेत ‘मेंदू खाणाऱ्या अमिबा’ची दहशत!

(new coronavirus strain is dangerous for children know how)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ