Brain Eating Amoeba | कोरोनाच्या संकटात आणखी एक धोका, अमेरिकेत ‘मेंदू खाणाऱ्या अमिबा’ची दहशत!

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या संशोधकांनीही या अमिबापासून होणाऱ्या संक्रमण आणि धोक्याचा अभ्यास केल्यानंतर अमेरिकन जनतेसाठी एक चेतावणी जारी केली आहे.

Brain Eating Amoeba | कोरोनाच्या संकटात आणखी एक धोका, अमेरिकेत ‘मेंदू खाणाऱ्या अमिबा’ची दहशत!

मुंबई : एकीकडे कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात कोलाहल माजलाय. कोरोनावर लस तयार करुन त्याचे वितरण होण्याची प्रतीक्षा अवघे जग करत आहे. दरम्यान, अमेरिकेत एक नवीन संकट निर्माण झाले आहे. अमेरिकन संशोधकांच्या मते, मानवी मेंदू खाणारा घातक अमिबा (Brain Eating Amoeba) अमेरिकेत वेगाने पसरतो आहे. हा अमिबा माणसाच्या मेंदूत शिरून त्याचे नुकसान करतो (Brain Eating Amoeba spreading rapidly in us).

हवामानातील बदलामुळे दक्षिणेकडून पूर्वेकडे सरकणार्‍या या अमिबाचे नाव ‘नेग्लेरिया फॉवलेरी’ असे आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या संशोधकांनीही या अमिबापासून होणाऱ्या संक्रमण आणि धोक्याचा अभ्यास केल्यानंतर अमेरिकन जनतेसाठी एक चेतावणी जारी केली आहे.

मेंदू कुरतडणाऱ्या अमिबाची दहशत

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या संशोधकांना असे आढळले आहे की, दरवर्षी या अमिबामुळे होणाऱ्या आजारांची संख्या समान असते. परंतु, यावर्षी त्याचे भौगोलिक परिघ बदलले आहे. नॉर्थ डकोटा, मिशिगन, इंडियाना, ओहायो, विन्कनसिन यासारख्या ठिकाणी हा आजार पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य होत चालला आहे. या अमिबामुळे मेंदूत संसर्ग होऊ शकतो. ‘नेग्लेरिया फॉवलेरी’मुळे होणाऱ्या या आजाराचे नाव अ‍ॅम्बरिक मेनिंगोएन्सेफलायटीस असे आहे.

‘अ‍ॅम्बरिक मेनिंगोएन्सेफलायटीस’ हा रोग घातक जीवघेणा रोग आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा नाकातून दूषित किंवा घाणेरडे पाणी शरीरात प्रवेश करते तेव्हा एखादी व्यक्ती या अमिबाच्या जाळ्यात येऊ शकते. नाकातून अथवा तोंडातून या अमीबाला मज्जातंतूद्वारे मेंदूपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडतो. यामुळे तो मानवांच्या मेंदूपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे आणि मेंदूपर्यंत पोहचून तो मेंदूचे प्रचंड नुकसान देखील करतो. यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो (Brain Eating Amoeba spreading rapidly in us).

अमेरिकेत गेला चिमुकल्याचा बळी

मेंदू कुरतडणारा हा अमिबा अमेरिका आणि आसपासच्या देशामध्ये वेगाने पसरतो आहे. ‘नेग्लेरिया फॉवलेरी’मुळे अमेरिकेत सप्टेंबरमध्ये एका सहा वर्षांच्या मुलाचा बळी गेला होता. 8 सप्टेंबरला जॉशिया मॅकिन्टायर या मुलाचा मेंदूच्या आजाराने मृत्यू झाला होता. नेग्लेरिया फॉवलेरी या अमिबाच्या संसर्गाने त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय तपासणीत सिद्ध झाले होते.

हा अमिबा तलाव, नद्यांमध्ये वाढतो आहे. अमेरिकेतील ढिसाळ व्यवस्थापन असलेल्या जलतरण तलावांच्या गरम आणि ताज्या पाण्यावर त्याची पैदास होत असल्याचे लक्षात आले आहे. त्यानंतर टेक्सासमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. हा अमिबा पाण्यावाटे मुलाच्या शरीरात गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

(Brain Eating Amoeba spreading rapidly in us)

हेही वाचा : 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI