
आपल्या सर्वांनाच माहित आहे की चंदनाचा वापर शतकानुशतके त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी आणि थंडावा देणाऱ्या गुणधर्मांसाठी केला जात आहे. तसेच चंदन त्वचेसाठी विशेषतः फायदेशीर आहे, कारण त्यात दाहक-विरोधी, जीवाणूविरोधी आणि थंडावा देणारे गुणधर्म आहेत. म्हणूनच त्वचेवर चंदन पावडरचा वापर केल्यास त्वचा मऊ, चमकदार आणि डागरहित होते. तर तुम्हाला ही तुमची त्वचा चमकदार हवी असेल तर आजच्या या लेखात आपण चंदनापासून बनवलेले 5 सर्वोत्तम फेस पॅक आणि त्यांचे फायदे याबद्दल जाणून घेऊयात…
हा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा चंदन पावडर आणि दोन चमचे गुलाबजल मिक्स करा आणि याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटे पॅक सुकू द्या, नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक त्वचेला थंडावा देतो. यामुळे चेहऱ्याची चमक वाढते आणि मुरुमे आणि डाग कमी होण्यासही खूप मदत होते .
हा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा दूध असे मिश्रण मिक्स करा आणि पेस्ट तयार करा. आता तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा. हा फेसपॅक लावल्याने त्वचेची चमक वाढते. पिंपल्स आणि मुरुमे कमी होतात आणि त्वचेचे संक्रमण देखील टाळता येते.
हा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा चंदन पावडर आणि एक चमचा दही मिक्स करून पेस्ट बनवा. तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहते. त्वचेवरील तेल नियंत्रित होते आणि त्याचबरोबर त्वचेतील मृत पेशी देखील स्वच्छ होतात.
हा फेसपॅक बनवण्यासाठी, एक चमचा चंदन पावडर आणि अर्धा चमचा मध एकत्र मिक्स करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा. हा फेसपॅक लावल्याने त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळते. त्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा घट्ट होते.
हा फेसपॅक बनवण्यासाठी, एक चमचा चंदन पावडर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे त्वचेवरील डाग हलके होतात. त्वचेवरील तेल नियंत्रित होते आणि चेहरा उजळ दिसतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)