Weight Loss : वर्क फ्रॉम होममुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी ‘या’ 7 टिप्स फाॅलो करा, झटपट वजन कमी होईल

कोरोनामुळे अनेक राज्यात लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे.

Weight Loss : वर्क फ्रॉम होममुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी 'या' 7 टिप्स फाॅलो करा, झटपट वजन कमी होईल
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 11:12 AM

मुंबई : कोरोनामुळे अनेक राज्यात लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. मात्र तासन्तास एकाच जागी बसून सतत काम केल्यामुळे अनेकांचे वजन वाढले आहे. काहींचा पाठदुखीचा त्रास वाढलाय, काहींच्या डोळ्यावर ताण येऊन अंधुक दिसायला लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘वर्क फ्रॉम होम’ करताना आपल्या आरोग्याची पुरेशी काळजी घेणेही आवश्यक आहे.  (Follow these 7 tips to lose weight due to work from home)

पाणी प्या

सकाळी उठल्यानंतर एक लिटर पाणी प्या. यानंतर, काम करताना तीन ते चार लिटर पाणी प्या. पाण्यात पुदीना आणि लिंबू मिसळून आपण डिटोक्स ड्रिंक बनवू शकता. यामधून आपल्याला पौष्टिक घटक देखील मिळतात आणि चरबी बर्न करण्यास देखील मदत होते. पाणी पिणे हे आपल्या हेल्दी आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे.

व्यायाम करा

सध्याच्या लाॅकडाऊनमध्ये आपण जिमसाठी किंवा व्यायामासाठी घराच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. मग अशावेळी आपण पुशअप आणि योगा घरी केला पाहिजे. दोरीवरच्या उड्या मारणे हा एक सोपा व्यायाम आहे, जो हृदयाचे ठोके सुधारतो. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या खूप फायदेशीर आहेत. यामुळे आपले वजन झटपट कमी होते.

वेल-बीईंग ब्रेक्स

अधून मधून ब्रेक घेतेवेळी स्क्रीन टाईमला काही क्विक स्ट्रेचमध्ये बदला. हे बुद्धी आणि शरिर दोन्हीसाठी फायदेशीर असते. एकाच स्थिती अधिक वेळ बसून शरीरात आलेली उदासिनता हटवण्यासही याची मदत होईल. नेक रोल, साईड स्ट्रेच, बॅक आणि अप्पर बॅक स्ट्रेच, सिटेड हिप स्ट्रेच, स्पाईन ट्विस्ट अशा प्रकारचे व्यायाम तुम्ही आपल्या डेस्कवरही करू शकता.

आहारात कडधान्य खा

निरोगी शरीरासाठी कडधान्य खाणे खूप फायदेशीर आहे. त्यात अँटीऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामुळे आपल्या शरीराला हवे असलेले सर्व पोषण घटक मिळतात. यामुळे आहारात जास्तीत-जास्त कडधान्याचा समावेश करा

डोळ्यांनाही हवा आराम

आपल्या शरीराच्या इतर अवयवांबरोबरच डोळ्यांनाही आरामाची गरज असते. यासाठी प्रत्येक 20 मिनिटानंतर स्क्रिनपासून दूर पाहण्याचा प्रयत्न करा. 20 सेकंदासाठी 20 फूट दूरवरच्या कोणत्याही वस्तूवर लक्ष केंद्रीत करा. यामुळे डोळ्यावरचा ताण कमी होईल.

जेवनाची वेळ ठरवा

सध्या वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे आपण जेवनाची वेळ पाळत नाहीत. यामुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम पडू शकतात. रात्री 7 ते 8 पर्यंत रात्रीचे जेवण करण्याचा प्रयत्न करा. योग्य वेळी अन्न खाल्ल्याने पचन चांगले होते. निरोगी पचन आणि निरोगी आतडे निरोगी शरीराचे वजन राखण्यासाठी आवश्यक आहे.

आहारात हिरव्या भाज्या खा

दररोज 2 ते 3 हिरव्या भाज्या खा. हंगामी फळे आणि भाज्या अँटी-ऑक्सिडेंटमध्ये समृद्ध असतात. बर्‍याच गोष्टींमध्ये फायबर समृद्ध असते. जे वजन कमी करण्यास मदत करते. बर्‍याच भाज्यांमध्ये कॅलरी कमी असते, कारण त्यात फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे आहारात जास्तीत-जास्त हिरव्या भाज्या खा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Follow these 7 tips to lose weight due to work from home)

Non Stop LIVE Update
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.