AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानी समूहाला सेबीचा दणका; या 6 कंपन्यांना पाठवली नोटीस, कारण तरी काय

उद्योगपति गौतम अदानी यांच्या 6 कंपन्यांना बाजार नियंत्रक सेबीने नोटीस पाठवली आहे. हिंडनबर्गचे भूत नेमकेच मानगुटीवरुन उतरले. पण आता ही नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यासंबंधीच्या काही शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुलासा मागविण्यात आला आहे.

अदानी समूहाला सेबीचा दणका; या 6 कंपन्यांना पाठवली नोटीस, कारण तरी काय
गौतम अदानी यांची मोठी खेळीImage Credit source: पीटीआय
| Updated on: May 03, 2024 | 3:40 PM
Share

देशातील दुसरे श्रीमंत उद्योजक आणि अब्जाधीश गौतम अदानी यांना एक मोठा झटका बसला आहे. अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्गचे भूत कंपनीच्या मानगुटीवरुन नुकतेच उतरले आहे. आता बाजार नियंत्रक SEBI ने या समूहातील 6 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये कंपन्यांना शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यासंबंधीच्या काही शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुलासा मागविण्यात आला आहे.

या नियमांचे केले उल्लंघन

सेबीने नोटीस पाठवली. त्यात कारण पण देण्यात आले आहे. त्यानुसार कंपन्यांनी रिलेटेड पार्टी व्यवहारांच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. रिलेटेड पार्टी व्यवहार म्हणजे यापूर्वी दोन कंपन्यांनी आप-आपसात केलेला व्यवहार, दोन कंपन्यांमध्ये पूर्वीपासूनच व्यवहार होत असल्यास त्याला रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन म्हणतात.

या कंपन्यांना मिळाली नोटीस

  1. सेबीने अदानी ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राईजेसला दोन नोटीस पाठवल्या आहेत. याशिवाय अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्यूशन्स, अदानी विल्मर आणि अदानी टोटल गॅस या कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. शेअर बाजारात या समूहातील एकूण 10 कंपन्या सूचीबद्ध आहेत.
  2. अदानी एंटरप्राईजेसला दोन नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. कंपनीच्या कायदेशीर सल्लागारानुसार, या नोटीसचा कंपनीवर फार मोठा परिणाम होणार नाही. सेबीच्या नोटीसमध्ये समूहातील कंपन्यांच्या काही व्यवहारांची माहिती विचारली आहे. ही माहिती कंपन्यांच्या आर्थिक ताळेबंदात दिसून न आल्याने ही नोटीस पाठविण्यात आली आहे. याप्रकरणी इतर माहिती देण्यास कंपनीने नकार दिला.

हिंडनबर्गचे काय कनेकन्शन?

गेल्यावर्षी अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चच्या एका अहवालाने अडाणी समूहात मोठा भूकंप आला होता. सर्वोच्च न्यायालयाने सेबीला या प्रकरणात अदानी समूहातील कंपन्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. सेबीने ऑगस्ट महिन्यात याविषयीचा एक अहवाल सादर केला होता. त्यातील 17 रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शनची चौकशी करण्यात आली. त्याचा संबंध हिंडनबर्गच्या अहवालाशी होता. अदानी हे भारतातील दुसरे श्रीमंत उद्योजक आहे. Bloomberg Billionaire Index नुसार, त्यांची एकूण संपत्ती 99 अब्ज डॉलरहून अधिक आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.