AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy : रोहित शर्माची टीम रणजी चॅम्पियन, 67 वर्षांनंतर ऐतिहासिक कामगिरी

Ranji Trophy Final Match Result : भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीर टीमने रणजी ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे.

Ranji Trophy : रोहित शर्माची टीम रणजी चॅम्पियन, 67 वर्षांनंतर ऐतिहासिक कामगिरी
jammu and Kashmir won maiden ranji trophy titleImage Credit source: PTI
| Updated on: Feb 28, 2026 | 5:12 PM
Share

टीम इंडियाला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध 2 हात करायचे आहेत. हा सामना 1 मार्चला होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना या सामन्याची प्रतिक्षा लागून आहे. अशात आता देशांतर्गत क्रिकेटमधून मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा याच्या जम्मू काश्मीर या टीमने इतिहास घडवला आहे. जम्मू काश्मीर टीम रणजी चॅम्पियन ठरली आहे. मात्र हा रोहित शर्मा टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार नाही. हा रोहित जम्मूचा गोलंदाज आहे. रोहित रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी जम्मू-काश्मीरच्या मुख्य संघात होता.

या सामन्याचं आयोजन हे हुबळीतील केएससीए अर्थात कर्नाटक क्रिकेट स्टेट असोशिएशनच्या क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं होतं. जम्मू काश्मीर विरुद्ध कर्नाटक महाअंतिम सामन्यात आमनेसामने होते. उभयसंघातील सामना पाचव्या दिवशी (28 फेब्रुवारी) अनिर्णित राहिला. सामना अनिर्णित राहिल्यानंतरही जम्मू चॅम्पियन कशी ठरली असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्याचं झालं असं की जम्मूने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली होती. ही आघाडी निर्णायक ठरली. सामना बरोबरी सुटल्यानंतर या आघाडीच्या निकषाच्या आधारावर जम्मू-काश्मीरला चॅम्पियन जाहीर करण्यात आलं.

67 वर्षांनंतर पहिली विजेतेपद

जम्मू काश्मीर क्रिकेट टीम रणजी ट्रॉफी स्पर्धेत 1959-60 पहिल्यांदा स्पर्धेत सहभागी झाली होती. तेव्हापासून ज्म्मूची पहिल्या विजेतेपदाची प्रतिक्षा कायम होती. अखेर पारस डोगरा याच्या नेतृत्वात जम्मूने काश्मीर टीमने ही कामगिरी करुन दाखवली आहे. या विजयानंतर जम्मू-काश्मीरमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

सामन्यात काय झालं?

जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात 584 धावांचा डोंगर उभा केला. कर्नाटकला प्रत्त्युत्तरात 293 धावाच करता आल्या. त्यामुळे जम्मू-काश्मीरला 291 धावांची मोठी आघाडी मिळाली. जम्मू काश्मीरने दुसऱ्या डावात 113 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमानून 342 धावांपर्यंत मजल मारली. जम्मू काश्मीरने 630 धावांची आघाडी मिळवली. जम्मू काश्मीरने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. त्यामुळे सामना अनिर्णित राखण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नियमानुसार, पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर जम्मू-काश्मीरला विजयी घोषित करण्यात आलं.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...