या मूलभूत गोष्टींचे अनुसरण करा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

| Updated on: Feb 20, 2021 | 7:54 PM

या मूलभूत गोष्टींचे अनुसरण करा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा (Follow these basics and get your diabetes under control)

या मूलभूत गोष्टींचे अनुसरण करा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा
कोरोनाची चार नवी लक्षणे
Follow us on

मुंबई : मधुमेह मॅनेजमेंट जितके दिसते तितके गुंतागुंतीचे नाही. मधुमेहासह निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्याला काही नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. या सोप्या पद्धती मधुमेहावर प्रभावी आहेत आणि आपल्या दिनचर्यात अडथळा आणणार नाहीत. डायबिटीज स्पेशलिस्ट सेंटरचे अध्यक्ष डॉ. मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार मधुमेह रुग्णांनी तीन सोप्या गोष्टींचे अनुसरण केल्यास निरोगी जीवनशैली जगू शकतात. मधुमेहग्रस्तांनी तणावमुक्त राहण्याची अधिक गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Follow these basics and get your diabetes under control)

मधुमेह मॅनेजमेंटच्या तीन महत्वपूर्ण स्टेप्स

हेल्दी डाएट
मधुमेहग्रस्तांनी पोषक आहार घेतला पाहिजे. कमी जीआय स्कोअर असलेले पदार्थ खाल्ले पाहिजे. अधिक साखरसुक्त पदार्थ आणि पेय टाळले पाहिजे.

वेळेत औषधे खा
मधुमेह निदान झाल्यानंतर डॉक्टर काही औषधे नियमित स्वरुपात घेण्यासाी देतात. ही औषधे आपण वेळेवर घेतली पाहिजे. तसेच आपल्या डॉक्टरांनी दिलेल्या इतर सूचनांचे पालन केले पाहिजे.

नियमित चेक अप करा
मधुमेह रुग्णांना नियमित घरी ब्लड शुगरची तपासणी केली पाहिजे. वर्षभरात कमीत कमी 3 ते 4 वेळा आपल्या डॉक्टरकडून नियमित तपासणी केली पाहिजे. याव्यतिरिक्त वर्षातून एकदा डोळे, किडनी, हृदय, पाय, शुगर, कोलेस्टेरॉल, लिव्हरसह संपूर्ण शरीराची तपासणी केली पाहिजे.

योगा, प्राणायम करणे फायदेशीर

जर आपण सूचनांचे पालन केले तर तुम्ही प्रभावीपणे मधुमेहावर नियंत्रण मिळवू शकता. तणावमुक्त राहणेही तितकेच महत्वाचे आहे. तणाव कमी करण्यासाठी तुम्ही योगा, प्राणायम किंवा डीप ब्रिथिंग करण्याचा प्रयत्न करा. अनेक लोक मधुमेहाच्या प्राथमिक अवस्थेत सावधानी बाळगत नाहीत आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर काळजी करतात. यासाठी सुरुवातीला काळजी घेतल्यास मधुमेहासह चांगले आयुष्य जगू शकता. (Follow these basics and get your diabetes under control)

 

 

इतर बातम्या

नवी मुंबईकरांनो सावधान! फेब्रुवारीत 2110 कोरोना रुग्णांची वाढ

हे आहेत प्रतिकारशक्ती वाढवण्याचे नैसर्गिक उपाय, तुमच्या जीवनशैलीत करा हे बदल