वाफ घेताना पाण्यात ‘या’ गोष्टी मिसळा, होतील अनेक फायदे !

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 27, 2021 | 4:50 PM

कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करताना दिसत आहे.

वाफ घेताना पाण्यात 'या' गोष्टी मिसळा, होतील अनेक फायदे !
Follow us

मुंबई : कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करताना दिसत आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आपल्याला आहारात फळे आणि हेल्दी आहार घ्यावा लागणार आहे. यासोबतच कोरोनापासून दूर राहण्यासाठी वाफ घेणे महत्वाचे आहे. (Follow this Tips while taking steam during the corona period)

आजकाल रुग्णालयांमध्येही कोविड रूग्णांना वाफ दिली जाते. कोरोनाविरूद्धच्या लढाईमध्ये वाफ घेणे महत्वाचे आहे, असे डॉक्टर देखील सांगतात. कोरोना रूग्णाव्यतिरिक्त, कोरोनाला टाळण्यासाठी प्रत्येकाने दिवसातून दोन वेळा तरी वाफ घेतली पाहिजे. चला जाणून घेऊयात वाफ घेण्याचे फायदे आणि वाफ घेण्याची नेमकी कोणती पध्दत योग्य आहे. हे जाणून घेऊयात.

या गोष्टी वापरा वाफ घेताना निलगिरीचे तेल वापरणे चांगले. सर्दी आणि फुफ्फुसांच्या समस्यांसाठी हे अतिशय प्रभावी मानले जाते. यासाठी, आपण त्याचे काही थेंब पाण्यात टाकून वाफ घेऊ शकता. जर निलगिरीचे तेल नसेल तर आपण लिंबू किंवा संत्राची साल, आले, दालचिनी, तेल किंवा कडुलिंबाची पाने देखील वापरू शकता. त्याशिवाय कार्व्होल प्लस कॅप्सूल पाण्यात टाकून वाफ घेता येते.

हे आहेत फायदे वाफ घेतल्याने नाक आणि घसा मोकळा होतो. याशिवाय वाफ घेताना पाण्यात टाकलेले तेल आणि औषधी वनस्पतींमध्ये अँटीमाइक्रोबियल असतात, जे शरीरातील जीवाणू आणि विषाणू नष्ट करण्यास प्रभावी मानले जातात. तथापि, डब्ल्यूएचओने याची पुष्टी केलेली नाही. परंतु डॉक्टर कोरोनाच्या लढाईत वाफ घेणे खूप प्रभावी आहे असे मानतात.

किती वेळा वाफ घेतली पाहिजे तज्ञांचा असा विश्वास आहे की, झोपण्याच्या वेळी आणि सकाळी उठल्यानंतर वाफ घेणे आवश्यक आहे. त्यावेळी शरीरात कफचा अधिक प्रादुर्भाव होतो. अशा परिस्थितीत, वाफ घेतल्याने घशात आणि फुफ्फुसात जमा होणारे कफ सहज बाहेर पडते. याशिवाय दिवसातून एकदा वाफ घेऊ शकता. एकावेळी कमीतकमी 10 ते 15 मिनिटे वाफ घेतली पाहिजे. योग्य मार्ग

वाफ घेण्याची पध्दत

वाफ घेण्यासाठी आपण एका भांड्यात पाणी उकळवून घेऊन औषधी वनस्पती किंवा निलगिरीचे तेलाच काही थेंब त्या पाण्यात टाकावे. त्यानंतर पाणी चांगले उकळवा. मग डोक्यावर टॉवेल ठेवून वाफ घ्या. तसेच, वाफ घेण्यासाठी बाजारात स्टीमर देखील मिळते. स्टीमर वाफ घेत असाल तर हे काही करण्याची गरज नाही पडणार, वाफ घेत असताना कोणाशीही 15 ते 20 मिनिटे बोलू नका.

संबंधित बातम्या : 

(Follow this Tips while taking steam during the corona period)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI