
जेव्हा आपण विमानप्रवास करतो, तेव्हा आपल्याला प्लेनमध्ये एक खाससा, सौम्य सुगंध जाणवतो. तो सुगंध मनाला फ्रेश करतो. पण तुम्ही कधी विमानात पायलट किंवा एअरहोस्टेसजवळून गेलात का? जर गेलात, तर लक्षात आलं असेल की त्यांच्या अंगाला कधीही हार्श, म्हणजेच तीव्र परफ्युमचा वास येत नाही. यामागे काही गंभीर कारणं आहेत. पायलटांना आणि क्रू मेंबर्सना काही विशिष्ट वस्तू वापरण्यास स्पष्ट मनाई असते यात परफ्युम, सैनिटायझर, माउथवॉश, टूथपेस्ट, इथपासून ते काही औषधांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो. चला तर जाणून घेऊया यामागचं शास्त्र आणि डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने दिलेली मार्गदर्शक तत्त्वं.
पायलट हा हवाई प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. उड्डाण करताना त्याचे पूर्ण लक्ष विमानावर असणे आवश्यक असते. अशावेळी जर त्याने परफ्युम वापरला, आणि त्याचा वास फारसा तीव्र असेल, तर त्याचे लक्ष सहजच विचलित होऊ शकते. एवढंच नाही, तर यामुळे काही प्रवाशांना अॅलर्जी देखील होऊ शकते. काहींना श्वास घेण्यास अडचण देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे DGCA ने स्पष्ट नियम केला आहे की पायलट आणि केबिन क्रूने कोणतीही अति सुगंधी गोष्ट वापरू नये.
एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फ्लाइट उड्डाणापूर्वी प्रत्येक पायलट आणि क्रू मेंबरचा ‘ब्रेथ अॅनालायझर टेस्ट’ केला जातो. हा टेस्ट यासाठी केला जातो की त्यांनी काही वेळ आधी एल्कोहोल घेतली नाही ना, हे तपासावं. पण परफ्युम, सैनिटायझर, माउथवॉश, टूथपेस्ट यासारख्या अनेक वस्तूंमध्ये लपूनछपून एल्कोहोल असतो. त्यामुळे अशा गोष्टी वापरल्यास टेस्टचा रिपोर्ट चुकीचा येऊ शकतो. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर पायलटला निलंबन किंवा आर्थिक नुकसान भोगावं लागू शकतं.
1. परफ्युम आणि डिओड्रंट – यातील सुगंध पायलटच्या एकाग्रतेत व्यत्यय आणू शकतो.
2. हँड सैनिटायझर – यात असणाऱ्या अल्कोहोलमुळे ब्रेथ अॅनालायझर टेस्टचा परिणाम चुकीचा येऊ शकतो.
3. माउथवॉश – बहुतेक माउथवॉशमध्ये अल्कोहोल असतो, जो अल्कोहोल टेस्टमध्ये अडचण निर्माण करू शकतो.
5. सुगंधीत औषधं किंवा फॉर्म्युलेशन्स – यातील घटक पायलटच्या सतर्कतेवर परिणाम करू शकतात.