लवकर उठा, व्यायाम करा आणि निरोगी जीवन जगा, वाचा!

| Updated on: May 23, 2021 | 12:30 PM

आपण सर्वजण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत की, सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी चांगले आहे.

लवकर उठा, व्यायाम करा आणि निरोगी जीवन जगा, वाचा!
Follow us on

मुंबई : आपण सर्वजण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत की, सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी चांगले आहे. परंतु बहुतेक लोक त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे त्याचे अनुसरण करत नाहीत. बऱ्याच लोकांना सकाळी लवकर उठायला आवडत नाही. मात्र, सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला होतात. लवकर उठल्याने तुम्ही दिवसभर तंदुरुस्त राहु शकता. आपण दररोज सकाळी लवकर उठून चालणे, व्यायाम आणि योग करू शकता, हे आपल्याला निरोगी ठेवेल. (Getting up early in the morning is beneficial for your healthy life)

चालणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. सोपा आणि उत्तम व्यायाम म्हणजे चालणे होय. जे लोक दररोज फिरायला जातात. त्यांना जीवघेण्या आजारांचा होण्याचा धोका कमी असतो. हा व्यायाम केल्याने तुमची रक्तातील साखर नियंत्रित होते. तर दररोज 35 ते 40 मिनिटे चाला. जर आपण सायकल चालवत असाल तर हे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. सायकलिंगमुळे हृदयाची गती वाढते आणि रक्त परिसंचरण सुधारते. असे केल्याने तुमची मांसाची स्नायू मजबूत होते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.

आपल्याला सकाळी लवकर उठायचे असले तर रात्री लवकर झोपावे लागते. यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेली झोप मिळते. पूर्ण झोप घेतल्यामुळे लठ्ठपणा आणि इतर आजार होत नाहीत. चांगल्या आरोग्यासाठी दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक असते. सकाळी लवकर उठणे आणि नियमित व्यायाम केल्याने आपल्याला चांगली झोप यायला मदत होईल. जेव्हा झोप पूर्ण होत नाही, तेव्हा डोकेदुखी आणि थकवा यासारख्या समस्या निर्माण होतात. शिवाय कामात लक्ष लागत नाही आणि चिडचिड होते.

चांगली झोप घेतल्यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकते. सकाळी लवकर उठल्यामुळे आपली बरीच कामे वेळेत होतात. याआधी बहुतेक लोकांना असे वाटायचे की, व्यायाम केवळ खुल्या मैदानात किंवा जिममध्येच केला जाऊ शकतो. परंतु, कोरोनामुळे आता या गोष्टी बदलल्या आहेत. आता आपण घरच्या घरी व्यायाम आणि योगा करू शकता. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपण घरीच पुशअप्स, चेस्ट फ्लाय, स्क्वॉट्स करू शकता. याशिवाय स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण योगासने देखील करू शकता. पाणी पिणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज किमान 4 ते 5 लिटर पाणी प्या.

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(Getting up early in the morning is beneficial for your healthy life)