केस, त्वचा निरोगी बनवण्यासाठी एकदा आजीचे ‘हे’ प्रभावी उपाय करा, प्रत्येकजण विचारेल यामागचे रहस्ये
बदलत्या हंगामात तुम्हाला तुमचे केस निरोगी ठेवायचे असतील किंवा तुमची त्वचा चमकदार बनवायची असेल तर आता महागड्या प्रोडक्टची आवश्यकता नाही, कारण नैसर्गिक नॅचरल गोष्टींचा वापर आपल्याला फायद्याचे ठरते तसेच या गोष्टी खूप उपयुक्त आहेत. या लेखात आपण केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी अशा जुन्या उपायांबद्दल जाणून घेऊ जे आपल्या आजींच्या काळापासून आजही प्रचलित आहेत.

आपल्याकडे अनेक सौंदर्याचे ट्रेंड येतात आणि जातात, पण आजीच्या टीप्स सदाबहार असतात. स्किन केअर असो की केसांची निगा, तसेच किरकोळ दुखापती, वेदना आणि आरोग्याच्या समस्यांवरही त्यांच्याकडे अनेक घरगुती उपाय आहेत, जे खूप प्रभावी आहेत. तर एकंदरीत आजीकडे प्रत्येक समस्येवर उपाय असतो. घराच्या स्वयंपाकघरात मिळणाऱ्या गोष्टी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत, फक्त त्यांचा योग्य वापर कसा करायचा हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. आजच्या आधुनिक जीवनशैलीत, लोक आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांशी संबंधित समस्यांनी खूप त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत, तुमच्या आहार आणि दिनचर्येकडे लक्ष देण्यासोबतच, तुम्ही घरगुती उपायांद्वारे या समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
आजकाल सोशल मीडियावर अनेक DIY हॅक्स आहेत. असा दावा केला जातो की हे एकाच वेळी चांगले परिणाम देतील, परंतु तुमच्या त्वचेला आणि केसांना फायदा होण्याऐवजी ते कधीकधी याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतो. मात्र तुम्ही जेव्हा घरगुती तसेच नॅचरल उपायांचा अवलंब करता तेव्हा त्या उपयांचा निकाल मिळण्यास थोडा वेळ लागला तरी, त्यांच्या दुष्परिणामांची भीती नसते. अशातच आपण आजच्या लेखात आजीच्या काही खास प्रभावी उपयांबद्दल जाणून घेऊयात…
शाम्पूला बाय-बाय करत केस असे धुवा
पूर्वीच्या काळी लोकं केस धुण्यासाठी रीठा, आवळा आणि शिकाकाई वापरत असत. यामुळे केस मजबूत होतातच, शिवाय केसांची वाढ चांगली होते आणि केसांची जाडीही वाढते. याशिवाय तुमचे केस बराच काळ काळे राहतात. यासाठी तुम्हाला जेव्हा केस धुवायचे असतील, त्याच्या आदल्यारात्री आवळा, रीठा आणि शिकाकाई थोड्या पाण्यात भिजवा. सकाळी हे सर्व हाताने मॅश करा आणि गाळून घ्या आणि या पाण्याने केस धुवा.
त्वचेसाठी मुलतानी माती आहे खूप उपयुक्त
त्वचेच्या काळजीपासून ते केसांच्या काळजीपर्यंत मुलतानी मातीचा वापर बराच काळापासून केला जात आहे. तुम्ही केस धुण्यासाठी देखील याचा वापर करू शकता, त्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. मुलतानी माती भिजवा आणि नंतर त्यात रीठ्याचे पाणी टाका आणि अशाने तुमचा नैसर्गिक शाम्पू तयार आहे. तर या व्यतिरिक्त त्वचेसाठी मुरुमांपासून मुक्त होण्याकरिता मुलतानी मातीमध्ये चिमूटभर हळद मिसळा आणि चेहऱ्यावर लावा, जर त्वचा खूप कोरडी असेल तर एक चमचा दही या मिश्रणात टाकुन हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.
स्किन केअर मध्ये बेसनाचा असा करा समावेश
बेसनाचा वापर तुमच्या त्वचेचा रंग सुधारण्यापासून ते मृत पेशी काढून टाकण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी केला जाऊ शकतो. एक चमचा बेसनामध्ये दही आणि हळद मिसळा. आठवड्यातून तीन वेळा या तीन गोष्टींचा फेसपॅक लावल्याने तुम्हाला हळूहळू तुमच्या त्वचेत सकारात्मक बदल दिसून येतील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
