Health Tips: फक्त चालण्याने आणि धावण्याने वजन कमी होतं? व्यायाम करणाऱ्या जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

Health Tips: फक्त चालण्याने आणि धावण्याने वजन कमी होतं अशी अनेकांची समज आहे. पण त्यासोबत काही गोष्टींची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अशात व्यायाम करणाऱ्यांनी काही खास टिप्स जाणून घ्या.

Health Tips: फक्त चालण्याने आणि धावण्याने वजन कमी होतं? व्यायाम करणाऱ्या जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
| Updated on: Oct 07, 2026 | 9:39 AM

Health Tips: आजच्या धकाधकीच्या आयु्ष्यात शारीरिक हालचालीसाठी वेळ बिलकूल मिळत नाही. अशात अनेक जण चालण्यावर आणि धावण्यावर भर देतात. पण फक्त चालल्याने आणि धावल्याने वजन कमी होतं का? हा मोठा प्रश्न आहे. सांगायचं झालं तर, आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्य टिकवण्यासाठी नियमित व्यायाम करणं ही सर्वात आवश्यक गोष्टींपैकी एक आहे. जेव्हा व्यायाम सुरू करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा बहुतेक लोकांच्या मनात सर्वप्रथम चालणं, धावणं आणि सायकलिंग यांसारखे कार्डिओ व्यायाम येतात. हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि झटपट वजन कमी करण्यासाठी कार्डिओ व्यायाम उत्तम आहेत यात शंका नाही. परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या मते, केवळ कार्डिओ करणे पुरेसं नाही.

जरी कार्डिओ व्यायामामुळे हृदय आणि स्नायूंची कार्यक्षमता वाढण्यास मदत होत असली तरी, याचा मुख्य तोटा असा आहे की, केवळ या व्यायाम पद्धतीमुळे स्नायूंची ताकद आणि आकार वाढू शकत नाही. जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याच्या उद्देशाने केवळ कार्डिओ करता, तेव्हा शरीरातील चरबीसोबत तुमचे स्नायू देखील कमी होण्याची शक्यता असते. याचं मुख्य कारण म्हणजे प्रथिनेयुक्त आहार आणि वेट ट्रेनिंगचा अभाव. त्यामुळे, कार्डिओसोबत वेट ट्रेनिंगचा समावेश करणं आवश्यक आहे.

Loading...

स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायू तयार होण्यास आणि वयानुसार नैसर्गिकरित्या येणारा स्नायूंचा अशक्तपणा टाळण्यास मदत होते. हे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी आणि शरीराचा तोल सांभाळण्यासाठी देखील उत्तम आहे. जेव्हा तुम्ही ‘वेट ट्रेनिंग’ हा शब्द ऐकता, तेव्हा बऱ्याच लोकांना जिममधील मोठ्या उपकरणांचा वापर करून वजन उचलण्याची आठवण येते. पण यासाठी तुम्हाला अवजड उपकरणे वापरण्याची गरज नाही. त्याऐवजी, साधे डंबेल्स, रेझिस्टन्स बँड्स आणि स्क्वॅट्ससारखे बॉडीवेट व्यायाम वापरून स्ट्रेंथ ट्रेनिंगचा सराव केला जाऊ शकतो.

चरबी कमी करण्यासाठी आणि शरीराला चांगला आकार देण्यासाठी, कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग एकत्र केलं पाहिजे. जेव्हा हे दोन्ही एकत्र केले जातात, तेव्हा व्यायामाचा परिणाम दुप्पट होतो. नवीन लोकांनी कार्डिओ व्यायामाने सुरुवात करावी आणि नंतर हळूहळू त्यात वेट ट्रेनिंगचा समावेश करावा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून किमान 150 मिनिटं कार्डिओ व्यायाम करणं आणि त्यासोबत किमान दोन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं खूप फायदेशीर आहे. व्यायामासोबत सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी, पौष्टिक आहार आणि पुरेशी विश्रांती यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us