Health Tips | मासे खावे वाटतात, आहारात जास्त समावेश करता ? मग होणारे संभाव्य आजार नक्की वाचा

कधीकधी माशांमध्ये काही विषारी घटक आढळतात. यातील काही विषारी घटकांमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. तसेच माशांचे जास्त प्रमाणात सेवन केले तर वजन वाढण्याचीदेखील शक्यता असते.

Health Tips | मासे खावे वाटतात, आहारात जास्त समावेश करता ? मग होणारे संभाव्य आजार नक्की वाचा
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 7:42 AM

मुंबई : मासे शरीरासाठी अतिशय पौष्टिक असतात. माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड (Omega-3 Fatty acid) व्हिटॅमिन्स (Vitamins) आणि प्रोटीन (Protein) भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. याच कारणामुळे मासे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र मासे जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरावर त्याचे काही वाईट परिणामदेखील होऊ शकतात. अतिप्रमाणात माशांचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. याच संभाव्य आजारांविषयी जाणून घेऊया.

मिळालेल्या माहितीनुसार समुद्राच्या पाण्यात मर्क्यूरी आणि पीसीबी अशा घटकांचे प्रमाण जास्त असते. पाण्यात असे घटक असल्यामुळे माशांच्या शरीरातदेखील ते जमा होतात. परिणामी माशांचे अती सेवन केले तर मानवी शरीरातदेखील अशा हानीकारक पदार्थांचा प्रवेश होण्याची शक्यता असते. त्यामुळे खालील आजार होण्याची शक्यता असते.

डोक्यावर परिणाम पडतो

माशांचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केले तर आपल्या शरीरात मर्क्यूरी आणि पीसीबी अशा प्रकारचे हानिकारक घटक वाढतात. हे घटक थेट मज्जासंस्थेवर परिणाम करतात. ज्यामुळे स्मृतीभंश होण्याची शक्यता वाढते.

गरोदर महिलांनाही भीती

गरोदर महिलांना माशांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. गरोदर असताना मासे खाल्ले तर त्याचा चांगला परिणाम मुलावर होते. मात्र आहारामध्ये माशांचा प्रमाणापेक्षा जास्त समावेश केला तर गर्भपात होण्याची शक्यता निर्माण होते.

कॅन्सर

ज्या लोकांच्या शरीरात पीसीबीचे प्रमाण जास्त असते, त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे माशांचे प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

मधूमेह

कधीकधी माशांमध्ये काही विषारी घटक आढळतात. यातील काही विषारी घटकांमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. तसेच माशांचे जास्त प्रमाणात सेवन केले तर वजन वाढण्याचीदेखील शक्यता असते.

(टीप- हे आर्टीकल इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारीत आहे. घाबरून न  एकदा जाता डॉक्टरांशी सल्लामसत नक्की करावी )

इतर बातम्या :

Satyamev Jayate : राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या अशोक स्तंभाच्या खाली लिहिले गेलेले सत्यमेव जयते ‘या’ ग्रंथातून घेण्यात आले, ही आहे त्यामागील कहाणी!

Skin care : त्वचेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर!

corona | कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रामबाण उपाय ‘काढा’,  जाणून घ्या काढा घेण्याचे फायदे