Perfect Bra Tips: प्रत्येक मुलीला माहिती पाहिजे ब्रा बद्दलचे ‘हे’ नियम! जाणून घेऊयात बेसिक माहिती

Perfect Bra Tips: प्रत्येक मुलीला माहिती पाहिजे ब्रा बद्दलचे ‘हे’ नियम! जाणून घेऊयात बेसिक माहिती
कम्फर्टेबल ब्रा

ब्रा हा प्रत्येक महिलांचा खाजगी आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. ब्रा बद्दल मुलींना सर्वप्रथम आईकडून काही गोष्टी सांगितल्या जातात. ब्रा कुठली घ्यावी, ब्राची काळजी कशी घ्यावी आणि कुठली ब्रा वापरायची नाही, हे साधारण महिलांना माहिती असतं. तरी देखील महिला गोंधळून जातात. अशावेळी आम्ही तुम्हाला ब्रासंबंधित काही नियम सांगणार आहोत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Dec 23, 2021 | 6:14 PM

ब्रा ही महिलांच्या आयुष्यातील गरजेची आणि जिव्हाळ्याची असते. योग्य ब्रा ही तुमच्या आरोग्यासाठी जेवढी महत्त्वाची असते तेवढीच ती तुमचा लूकही बदलते. एखाद्या ड्रेसखाली योग्य ब्रा नसेल तर यामुळे तुमचा लूक खराब दिसू शकतो.
ब्राबद्दल बेसिक माहिती आपल्याला असते. तरी महिला ब्रा घेताना गोंधळतात आणि चुकीच्या ब्राची निवड करतात. त्यामुळे ब्राबद्दलचे नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय आहेत ब्राचे नियम?

1. ब्रा फिटिंगला परफेक्ट असावी
तुम्हाला तुमच्या ब्राची योग्य साईज कायम माहिती पाहिजे. यासाठी तुम्ही दुकानातील स्टाफची मदत घेऊ शकता. किंवा घरी मेजरमेंट टेप असेल तर त्यांने तुमच्या छातीचा भाग मोजून घ्यावा. त्यानंतर तुम्ही योग्य आकाराची ब्रा निवडा. जर तुमची साईज 32 असेल तर आता कप साईजही तेवढीच महत्त्वाची आहे. ती लक्षात येण्यासाठी तुम्ही ब्रा ट्रायल रुममध्ये घालून बघा. आणि मग
32A, 32B, 32C, 32D यातून आपली परफेक्ट साईज समजून घ्या. ब्रा घातल्यावर आपल्याला श्वास घ्यायला अडचण होत नाही ना, हे तपासा. आपल्या कुठल्या अंग त्यातून बाहेर येत नाही हे योग्य प्रकारे बघा.

2. आरोग्यासाठी परफेक्ट ब्रा
तुमच्या आरोग्य आणि स्तनांसाठी ब्रा ही कायम परफेक्ट असावी. ब्रासंबंधित एक नियम हा देखील आहे रात्री झोपताना ब्रा काढून झोपावे.

3. खरेदीसाठी खास वेळ काढा
ब्रा खरेदी करण्यासाठी जाताना खास वेळ काढून जायला हवं. कारण जी ब्रा तुम्ही घेत आहात ती योग्य आहे ते तपासून पाहण्यासाठी तुमचाकडे वेळ असावा. अगदी आवडलेली प्रत्येक ब्रा घालून बघा, की योग्य आहे का, तुम्हाला ती कम्फर्टेबल आहेत हे पाहायला पाहिजे.

4. वर्षातून दोन करा ही खास खरेदी
वर्षातून दोन वेळा तरी ही ब्राची खरेदी केली पाहिजे. महिलांचं वजन कमी जास्त होत असतं अशावेळी आपल्या स्तनाचा आकारही बदलतो. मग योग्य आकाराची ब्रा घेणं गरजेचं असतं.

5. डेलिकेट ब्राला ठेवा खास पद्धतीने
डेलिकेट ब्राची खास काळजी घेण्याची गरज असते. या ब्रा खास रॅप करुन ठेवा. तसंच ती फोल्ड करुन ठेवू नये.

6. मशिनमध्ये धुऊ नका
ब्रा मशीनमध्ये धुऊ नका. कारण अशाने त्या खराब होतात. जर मशिनमध्ये धुवायची असेल तर लॉजरी बॅगचा वापर करा. आजकाल नवीन वॉशिंगमध्ये लॉजरी असा मोडही असतो. शक्य असेल तर ब्रा हाताने धुवा याने ब्रा खराब होत नाही.

7. अशी सुकवू नका
ड्रायरमध्ये ब्रा सुकवू नका आणि उन्हात सुद्धा सुकवू नका. ब्रा ही कायम सावलीमध्ये सुकवावी.

8. या ब्रा वापरु नका
ब्राचा इलास्टिक सैल झाला असेल तर अशा ब्रा वापरु नका. आणि तुमचं वजन वाढलं असेल किंवा कमी झालं असेल ज्यामुळे ब्राचा साइज बदलला असेल तर चुकीची साईज घालू नका.

इतर बातम्या-
Mumbai : मुंबईची आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटिलेटरवर’, शिवसेना पेंग्विन बाळाच्या बारशात मश्गूल-भाजप

IPL 2022: ब्रायन लारा आणि डेल स्टेनने IPL मधील ‘या’ संघाच्या प्रशिक्षकपदाची स्वीकारली जबाबदारी


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें