मुलाच्या वजन-उंचीमुळे तुम्ही त्रासले आहात? 6 पदार्थ तुमची चिंता करतील दूर

| Updated on: Feb 23, 2022 | 10:31 AM

मुलांची उंची आणि वजन वाढविण्यासाठी काय केलं पाहिजे हे कळतं नाही. मग आज आम्ही तुम्हाला या समस्यचे उत्तर देणार आहे. घरगुती उपाय (Home Remedies) केले तर तुम्ही मुलांची उंची (Height) आणि वजन (Weight) वाढवू शकता.

मुलाच्या वजन-उंचीमुळे तुम्ही त्रासले आहात? 6 पदार्थ तुमची चिंता करतील दूर
लहान मुलांच्या उंचीबाबत समस्या
Follow us on

मुंबई : तुमच्या मुलाची उंची आणि वजन इतर मुलांपेक्षा कमी आहे का? त्याला इतर मुलं त्यावरून चिडवतात. मुलांची उंची आणि वजन वाढविण्यासाठी काय केलं पाहिजे हे कळतं नाही. मग आज आम्ही तुम्हाला या समस्यचे उत्तर देणार आहे. घरगुती उपाय (Home Remedies) केले तर तुम्ही मुलांची उंची (Height) आणि वजन (Weight) वाढवू शकता. कोरोनाच्या संकटात गेल्या दोन वर्षांपासून मुलं घरात डांबून होते. त्यांचा शरीराला कुठलाही व्यायाम मिळाला नाही. लोकांची जीवनशैली बदलली. याचा परिणाम मुलांचा विकासावर झाला. मुलांचा विकासासाठी शारीरिक व्यायाम आणि पोषक आहाराची गरज असते. प्रत्येक आईवडिल मुलांचा विकासासाठी खूप चिंतेत असतात. मुलांची उंची आणि वजन वाढविण्यासाठी त्यांचा आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास ही समस्या सहज दूर होऊ शकते.

आहारात हे द्या आणि मुलांचा विकास करा

  1. केळी – मुलांचा विकासासाठी आणि वजन वाढविण्यासाठी केळी ही खूप महत्त्वाची आहे. केळीला सूपरफूड म्हणतात. केळीमध्ये पोटॅशियम, कार्बोहाईड्रेट, व्हिटॅमिन सी, बी6 आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. रोज दिवसा एक केळी खाली तर मुलांचं वजन आणि उंची वाढविण्यासाठी फायदा होता. जर तुम्ही बनाना मिल्क शेक मुलांना दिलं तर या जास्त फायदा होतो.
  2. चीज – चीज हे वजन आणि उंची वाढविण्यासाठी सर्वोत्तम आहे. मुलांना चीज खूप आवडतं. आणि आपण वेगवेगळ्या पदार्थांसोबत मुलांना चीज देऊ शकतो. यामधील भरपूर प्रमाणात असलेलं प्रोटिन आणि फॅट मुलांसाठी चांगलं आहे. तुम्ही मुलाला दररोज एक चीजचा तुकडा खायला देऊ शकता.
  3. तूप – लहान मुलांना घरगुती तूप रोज जेवण्यात दिलं पाहिजे. पुरातन काळापासून वजन आणि उंची वाढविण्यासाठी लहान मुलांचा आहारात तुपाचा समावेश करण्यात येत आहे. तूपामध्ये कॅल्शियम, आयरन आणि प्रोटिन मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे मुलांना देण्यात येणारे पदार्थ हे तेला ऐवजी तुपात केले असावे. मुलांचा खिचडी, सूप, रागीचा शिरा आदी पदार्थ तुपापासून तयार करा. तूप हे मुलांच्या संपूर्ण विकासासाठी उत्तम आहे.
  4. अंडी – संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, ही जाहिरात आपण अगदी आपल्या लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मुलांचा विकासासाठी अंडी ही खूप चांगली आहे. रोज मुलांना अंडाचा पांढरा भाग खायला दिला पाहिजे. अंड्याची एक खासियत आहे. अंडापासून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करु शकतो. लहान मुलांना अंड्याचे सर्व पदार्थ आवडतात. म्हणून त्यांना आपण अंडी सहज रोज देऊ शकतो. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी 12 आणि रिबोफ्लाविन असतं. ते मुलांची उंची वाढविण्यासाठी फायदेशीर आहे.
  5. सोयाबीन – तुम्ही शाकाहारी असाल तर मुलांचा आहारात सोयाबीनचा समावेश करा. मुलांची उंची आणि वजन वाढविण्यासाठी सोयाबीन हे सगळ्या चांगले अन्नपदार्थ आहे.
  6. गूळ आणि चणे – आजीआजोबा कायम मुलांना गुळ चणे खाण्यास सांगतात. गुळ आणि चणे एकत्र खाल्ल्यामुळे मुलांचा विकास होतो. मोठ्या प्रमाणात ताकद मिळते. उंची आणि वजन वाढविण्यासाठी गूळ आणि चणे एकत्र खाण्याचा फायदा होतो. गूळ आणि चणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

संबंधित बातम्या

रोगांना दूर ठेवण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी दररोज चॉकलेटचा 1 तुकडा नक्की खा, वाचा अत्यंत महत्वाची माहिती!

दूधाशिवाय कॉफी पिण्याचे अनेक फायदे, जाणून घ्या ब्लॅक कॉफी पिणे किती फायदेशीर आहे!

जास्त प्रमाणात चपाती खाताय? आताच व्हा सावधान ! ,जाणून घ्या यामुळे होणारे आजार..