AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जास्त प्रमाणात चपाती खाताय? आताच व्हा सावधान ! ,जाणून घ्या यामुळे होणारे आजार..

भारताच्या सगळ्या भागात चपाती अनेकदा आवडीने खाल्ली जाते.चपाती खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात परंतु चपाती खाल्ल्याने शरिरावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतात.

जास्त प्रमाणात चपाती खाताय? आताच व्हा सावधान ! ,जाणून घ्या यामुळे होणारे आजार..
चपाती
| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 10:42 PM
Share

भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक लोक चपाती खात (chapati eating) असतात. प्रत्येकाला चपाती खाणे आवडत असते. चपाती मध्ये शरीरामध्ये वेगळे पोषकतत्व प्रदान करण्याची क्षमता असते आणि म्हणूनच अनेकदा ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागांमध्ये सुद्धा चपाती मोठ्या आवडीने वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाल्ली जाते. चपाती मध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व पोषक तत्व विटामिन्स खनिजे उपलब्ध असतात आणि म्हणूनच चपातीला मुख्य आहार (main diet) मानला जातो. अनेक लोकांना चपाती खाणे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते. ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये ऑक्सालेटची मात्रा मर्यादेपेक्षा जास्त असते, अशा व्यक्तींसाठी चपाती खाणे धोकादायक ठरते. ज्या व्यक्तींच्या शरीरांमध्ये ऑक्सालेटची मात्रा जास्त असते, अशा व्यक्तीने चपाती पासून लांबच राहायला आहे. गव्हाच्या चपातीमध्ये ऑक्सालेटची मात्रा जास्त असते आणि म्हणूनच आपण दिवसभरातून अनेक वेळा चपाती खात असतो. जर या घटकाची मात्रा आपल्या शरीरामध्ये मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यास भविष्यात आपल्याला अनेक गंभीर आजार( dangerous disease) सुद्धा होऊ शकतात.

याशिवाय आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे बाशी चपाती खायला हवी किंवा नको याबद्दल संभ्रम मनामध्ये निर्माण करतात.अशा वेळी आणि तुम्हाला सांगू इच्छितो की, रात्री उरलेली चपाती म्हणजेच बाशी चपाती काही व्यक्तींच्या शरीरासाठी लाभदायक ठरते, तर काही व्यक्तींच्या शरीरासाठी नुकसानदायक सुद्धा ठरू शकते.

गंभीर आजार होण्याची शक्यता

ज्या व्यक्तीचे शरीर कोणत्याही प्रकारचे अन्न पचन करू शकते अशा प्रकारच्या व्यक्तींना बाशी चपाती खाणे कधीही लाभदायक ठरते. ज्या व्यक्तींची पचन संस्था कमजोर आहे. खालेल्ले लवकर पचत नाही अशा व्यक्तींनी शक्‍यतो रात्रीचे उरलेले अन्न पदार्थ खाऊ नये यामुळे त्या व्यक्तींच्या शरीरांमध्ये गॅस, अपचन, ऍसिडीटी गॅस यासारख्या समस्या त्रास देऊ शकतील. जर तुम्ही खाल्लेले पदार्थ पचले नाही तर तुम्हाला भविष्यात पोटांच्या अनेक समस्या होतील आणि या समस्यांकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात गंभीर आजार सुद्धा होऊ शकतील.

पोटदुखीची शक्यता

ज्या व्यक्तींचे शरीर कमजोर असते, अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नाही. जेव्हा भविष्यात आपण बाशी चपाती खातो तेव्हा अनेकदा पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्य करत नसल्यामुळे चांगली ऊर्जा निर्माण होण्याऐवजी वाईट ऊर्जा निर्माण होते.अनेकदा व्यक्तीच्या शरीरामध्ये फूड पॉइझनिंग समस्यादेखील उद्भवते. जास्त प्रमाणात चपाती खाल्ल्याने आपल्याला पोट दुखी सुद्धा होते. पोटामध्ये वेदना जाणवतात.

जर तुम्ही नेहमी बाशी चपाती सेवन करत असाल तर तुम्हाला शरीरामध्ये हलका ताप जाणवू शकतो ज्यामुळे तुमचे शरीर दिवसेंदिवस कमजोर होईल. नेहमी बाशी चपाती फ्रीजमध्ये ठेवावी. चपाती बाहेर ठेवत असाल तर या चपाती मध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकते आणि परिणामी भविष्यात गंभीर आजार होऊ शकतो.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

इतर बातम्या: 

Ulhasnagar Crime : इन्स्टाग्रामवर दादागिरीचे रिल्स बनवणं तरुणांना महागात, सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून पोलिसांची कारवाई

लहान मुलांचा थकवा दूर करण्यासाठी काय करता येईल…जाणून घ्या एका क्लिकवर…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.