
आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. तरुण आणि वृद्ध दोघांनाही कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या समस्येचा सामना करावा लागत आहे. निरोगी पेशी तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉल आवश्यक असले तरी त्याचे जास्त प्रमाण हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणासारख्या समस्यांना कारणीभूत ठरते. चरबीयुक्त आहार, व्यायामाचा अभाव, जास्त वजन, धूम्रपान आणि काहीवेळा अनुवांशिक कारणांमुळे कोलेस्ट्रॉल वाढते. ही समस्या गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते, जरी त्याची लक्षणे सहसा दिसून येत नाहीत. पण उच्च कोलेस्ट्रॉलमुळे आणखी कोणते गंभीर आजार होताता. चला जाणून घेऊया…
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल हे यकृताद्वारे निर्मित चरबीयुक्त पदार्थ आहे, जे शरीराच्या कार्यासाठी अत्यावश्यक आहे. प्रत्येक पेशीला जगण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. रक्ताच्या प्लाझ्माद्वारे ते शरीराच्या विविध भागांपर्यंत पोहोचते. परंतु, जेव्हा त्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त होते, तेव्हा गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात.
वाचा: भात खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या सत्य
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे होणारे आजार
उच्च रक्तदाब: कोलेस्ट्रॉल वाढल्याने धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे रक्तप्रवाह बाधित होतो. यामुळे हृदयाला जास्त दबाव टाकावा लागतो, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकार किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.
ब्रेन स्ट्रोक: कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अनियंत्रित झाल्यास मेंदूपर्यंत रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो, ज्यामुळे पक्षाघाताचा धोका वाढतो.
हृदयविकार: जास्त कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे रक्त गोठण्याची समस्या उद्भवते, तसेच हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येऊ शकतो.
पाय दुखणे: कोलेस्ट्रॉलच्या वाढीमुळे पाय सुन्न होणे किंवा दुखण्याची समस्या उद्भवते, ज्यामुळे सतत थकवा जाणवतो.
खराब कोलेस्ट्रॉलपासून संरक्षण
सॅच्युरेटेड फॅटयुक्त पदार्थ जसे की मांस, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, खोबरेल तेल, पाम तेल, लोणी, चॉकलेट, तळलेले पदार्थ आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावेत. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि धूम्रपान टाळून खराब कोलेस्ट्रॉल (एलडीएल) कमी करता येऊ शकते. ज्यामुळे निरोगी जीवन जगणे शक्य होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)