International Tea Day | भारतात चहाची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या तुमच्या चहाचा रंजक इतिहास

| Updated on: Dec 15, 2020 | 4:53 PM

जवळपास 2000 वर्षांपूर्वी भारतातीलच एका बौद्ध भिक्षुंनी चहाचा शोध लावला होता. तेव्हा त्यांनी या वनस्पतीचा औषधी म्हणून वापर केला होता.

International Tea Day | भारतात चहाची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या तुमच्या चहाचा रंजक इतिहास
Follow us on

मुंबई : चहा हा परदेशी आहे. मात्र, जगात सर्वाधिक चहाचं सेवन सध्या (International Tea Day) भारतात केलं जातं. चहा भारतात इंग्रजांनी आणला हे खरं आहे. पण, जवळपास 2000 वर्षांपूर्वी भारतातीलच एका बौद्ध भिक्षुंनी चहाचा शोध लावला होता. तेव्हा त्यांनी या वनस्पतीचा औषधी म्हणून वापर केला होता. आज जागतिक चहा दिवस आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला चहाचा इतिहास सांगणार आहोत, जो कदाचित तुम्हाला आतापर्यंत माहित नसेल (International Tea Day).

झोप येऊ नये म्हणून बौद्ध भिक्षू चहाची पानं चावायचे

बौद्ध भिक्षू जेन जे नंतर बौद्ध धर्माचे संस्थापक झाले. त्यांनी जीवनाचं रहस्य जाणून घेण्यासाठी सात वर्षांसाठी निद्रा त्याग केला होता. जेव्हा ते पाचव्या वर्षात होते तेव्हा त्यांनी बुशची पानं चावायला सुरुवात केली. या पानांच्या आधारे ते जिवंत होते आणि ही पानं चावल्यानंतर त्यांना झोप यायची नाही. ही पानं जंगली चहाची पानं होती. त्यानंतर या पानांना इतर लोकही चावू लागले.

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने उत्पादनाची सुरुवात केली

16 व्या दशकापर्यंत लोकांनी चहाच्या पानांचा वापर भाजीच्या रुपात केला. तसेच, याला वाटून ते काळं पेय बनवून त्याचं सेवन करायचे. पण, 19 व्या शतकात भारतात याचं उत्पादन ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने सुरु केलं. त्यासोबतच, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने आसाममध्ये पहिली चहाची बागही सुरु करण्यात आली. त्यानंतर चहाचं चलन वाढलं. आज देशातील अनेक भागांमध्ये चहाची शेती केली जाते.

भारतातील चहाची लागवड

आज भारतात दार्जिलिंग, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये चहाच्या महत्त्वाच्या बागा आहेत. इथे सगळीकडेच उत्तम दर्जाचा चहा तयार होतो. टी बोर्ड ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण आसाममध्ये एकूण 43 हजार 292 चहाच्या बागा आहेत. 62 हजार 213 चहाच्या बागा निलगिरीमध्ये आहेत. तर दार्जिलिंगमध्ये 85 चहाच्या बागा आहेत (International Tea Day).

चहाचे लोकप्रिय प्रकार

आसाम टी

आसाम राज्यात चहाचे सर्वाधिक मळे आहेत. येथे पिकणारी चहा आसाम टी नावाने ओळखली जाते. ब्रिटिशांनी आसाम राज्यापासूनच चहाला ओळख मिळवून दिली होती. आसाममध्ये चहाचे भारतातील सर्वात मोठे संशोधन केंद्र आहे.

कांगडा टी

हिमाचल प्रदेशातील कांगडा भाग देखील चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात 1829 पासून चहाचे उत्पादन घेतले जाते. हिरवा आणि काळ्या रंगाची चहा येथे पिकवली जाते. कांगडा टी हा प्रकारदेखील दार्जिलिंग आणि आसाम टीप्रमाणे अतिशय लोकप्रिय आहे.

दार्जिलिंग टी

भारतात दार्जिलिंगचा चहा अतिशय लोकप्रिय आहे. दार्जिलिंगमध्ये 1841 पासून चिनी चहाची रोपे उगवली जातात. वेगळ्या चवीमुळे दार्जिलिंग चहाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त असते. दार्जिलिंगमध्ये उगवणार्‍या चहाला संपूर्ण जगभरातून मोठी मागणी आहे.

International Tea Day

संबंधित बातम्या :

Coffee | कॅपेचिनो-लाटे-मॅकियाटो-अमेरिकानो, कॉफीचे प्रकार आणि बरंच काही…

Lemon Benefits | लिंबाचा सुगंध मूड करेल फ्रेश, शरीरालाही होतील प्रचंड फायदे, संशोधकांचा दावा!

Fitness Tips : कमी वेळात जास्त वजन कमी करायचं आहे?, ‘हे’ Superfood ट्राय करा