AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coffee | कॅपेचिनो-लाटे-मॅकियाटो-अमेरिकानो, कॉफीचे प्रकार आणि बरंच काही…

मेनू कार्डमध्ये अनेक प्रकारच्या कॉफीची नावे पाहून कोणती कॉफी ऑर्डर करावी याबद्दल बराच गोंधळ उडतो.

Coffee | कॅपेचिनो-लाटे-मॅकियाटो-अमेरिकानो, कॉफीचे प्रकार आणि बरंच काही...
| Updated on: Dec 10, 2020 | 11:58 AM
Share

मुंबई : कॉफी हे एक असे पेय आहे, जे आपल्याला रीफ्रेश करते. सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा ऑफिसमध्ये काम करताना थकल्यावर, एक कप कॉफी प्यायल्याने आपल्याला आराम वाटतो. बर्‍याच वेळा एक कप कॉफी देऊन एखाद्या व्यक्तीचे हृदयही जिंकले जाते. गरम-गरम कॉफी, कोल्ड कॉफी, फिल्टर कॉफी…. सामान्यत: बर्‍याच लोकांना या प्रकारच्या कॉफीबद्दल माहिती असते. परंतु, कॉफीचे असे बरेच प्रकार आहेत (Different Types of coffee).

आपल्यापैकी बरेच लोक मित्र-मैत्रिणी, जोडीदार यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी कॉफी हाऊसमध्ये जातात. परंतु, तेथील लाँग मेन्यू कार्ड पाहून त्यांचे डोके चक्रावते. मेनू कार्डमध्ये अनेक प्रकारच्या कॉफीची नावे पाहून कोणती कॉफी ऑर्डर करावी याबद्दल बराच गोंधळ उडतो. तर, चला पाहूया असे कॉफीचे किती प्रकार आहेत आणि त्या कशा बनवल्या जातात…

फिल्टर कॉफी

फिल्टर कॉफी दक्षिण भारतात खूप लोकप्रिय आहे. नेसकॅफेसारख्या इन्स्टंट कॉफी वापरून, चहाप्रमाणे गाळून फिल्टर कॉफी तयार केली जाते. एका भांड्यात भरपूर पाणी, थोडेसे दूध आणि कॉफी पावडर मिसळून फिल्टर कॉफी तयार केली जाते. उकळून एका कपात गाळून सर्व्ह केली जाते.

कॅपेचिनो

एस्प्रेसो कॉफीमध्ये गरम दूध आणि वर भरपूर फेस, ही आपल्या कॅपेचिनोची ओळख आहे. त्यावर कोको पावडर देखील शिंपडली जाते. बरेच कॅफे आपापल्या वेगळ्या वेगळ्या शैलीत कॅपेचिनो बनवतात.

लाटे

आपण कॅपेचिनो बनवत असल्यास, तिचे लाटे बनवण्यासाठी आणखी थोडे दूध घालावे लागेल. ‘लाटे’ या इटालियन शब्दाचा अर्थ ‘दूध’ आहे. लाटे ही दूधयुक्त एक कॉफी आहे. त्यात एक भाग एस्प्रेसो आणि दोन भाग दूध घालून उंच ग्लासमध्ये सर्व्ह केली जाते (Different Types of coffee).

मॅकियाटो

लाटेप्रमाणेच, मॅकियाटो देखील एक हृदय प्रसन्न करणारी कॉफी आहे. लाटे बनवताना एस्प्रेसोमध्ये दूध एका चमच्याने मिसळले जाते, तर मॅकियाटोमध्ये दुधाने भरलेल्या ग्लासमध्ये एस्प्रेसो हळूहळू मिसळून त्याचे थर तयार केले जातात.

मोका कॉफी

मोका हा लाटेचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये चॉकलेट सिरप मिसळले जातो. त्याला मोकाचिनो देखील म्हणतात.

अमेरिकनो

ही कॉफी सामान्य फिल्टर कॉफीसारखी दिसते. परंतु, यामध्ये फरक इतकाच आहे की, ते एस्प्रेसोच्या एक किंवा दोन भागात अधिक गरम पाणी मिसळून तयार केली जाते. असे केल्याने, त्याची चव फिल्टर कॉफीपेक्षा काहीशी वेगळी होते (Different Types of coffee).

कोल्ड कॉफी फ्रॅपे

कोल्ड कॉफी बर्‍याच ठिकाणी फ्रॅपे म्हणून ओळखली जाते. प्रत्येक देशांत किंवा प्रदेशात कोल्ड कॉफी बनवण्याची पद्धत भिन्न असू शकते. कुठे थंड पाण्यात मिसळून कोल्ड कॉफी बनवली जाते. तर, कुठे थंड दुधात आणिकाही ठिकाणी थंड दूध आणि पाणी दोन्ही एकत्र करून कोल्ड कॉफी बनवली जाते. अनेक ठिकाणी यामध्ये आईस्क्रीम देखील मिसळले जाते.

आयरिश कॉफी

आयरिश कॉफीमध्ये व्हिस्की मिसळली जाते. आयरिश कॉफीमध्ये प्रथम एका कपमध्ये थोडी व्हिस्की, गरम फिल्टर कॉफी आणि नंतर त्यावर थंड फेस घातला जातो. काचेच्या कपमध्ये सर्व्ह केली जाणारी आयरिश कॉफीचे बाहेरून काळ्या व पांढर्‍या थर सुंदर दिसतात.

अशा प्रकारच्या कॉफी व्यतिरिक्त कॉफीचे आणखी काही प्रकार देखील आहेत. कॉफी पिणे ही वाईट गोष्ट नाही परंतु, तिच्या व्यसनाधीन होऊ नये. कॅफीनयुक्त कॉफी अधिक प्यायल्यामुळे शरीराचे हानी होऊ शकते असे, डॉक्टरांचे म्हणणे आहे.

(Different Types of coffee)

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.