AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lemon Benefits | लिंबाचा सुगंध मूड करेल फ्रेश, शरीरालाही होतील प्रचंड फायदे, संशोधकांचा दावा!

लिंबाचा सुगंध आपल्याला दिवसभराची ऊर्जा प्रदान करतो आणि ताजेतवाने राहण्यास मदत करतो. लिंबू ही अशी गोष्ट आहे जी आपले फॅट बर्न करण्यास देखील प्रभावी आहे.

Lemon Benefits | लिंबाचा सुगंध मूड करेल फ्रेश, शरीरालाही होतील प्रचंड फायदे, संशोधकांचा दावा!
लिंबू पाणी
| Edited By: | Updated on: Dec 15, 2020 | 12:59 PM
Share

मुंबई : आपल्या प्रत्येकाच्या जीवनात लिंबाला एक विशेष स्थान आहे. शरीराला वेळोवेळी लिंबातील पोषक घटकांची आवश्यकता असते. लिंबाचा सुगंध आपल्याला दिवसभराची ऊर्जा प्रदान करतो आणि ताजेतवाने राहण्यास मदत करतो. लिंबू ही अशी गोष्ट आहे जी आपले फॅट बर्न करण्यास देखील प्रभावी आहे. इंग्लंडच्या सुसेक्स युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात दावा केला आहे की, लिंबाचा सुगंध (Lemon fragrance) तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवतो, तसेच तुम्हाला हलकेपणा जाणीव करून देतो. त्याच वेळी, व्हॅनिलाच्या सुगंधामुळे आपल्याला अधिक जडपणा जाणवतो (Study Reveals that Lemon fragrance is useful for body).

सुसेक्स युनिव्हर्सिटीच्या पीएचडी स्कॉलर गिआडा ब्रिआंजा म्हणतात, आमच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, सुगंध आपल्या शरीराबद्दल नकारात्मक दृष्टिकोन ठेवतो, परंतु सुगंधाच्याच मदतीनेच तो बदलला देखील जाऊ शकतो. याचा सर्वात मोठा फायदा लठ्ठ लोकांना होईल. कारण, लिंबाच्या सुगंधामुळे अशा लोकांची आपल्या शरीराबद्दलची नकारात्मक विचारसरणी बदलली जाऊ शकते. इतर कोणती तंत्रे वापरून, किंवा कपड्यांमध्ये सुगंध वापरुन बॉडी परसेप्शन डिसऑर्डर या आजाराचा उपचार केला जाऊ शकतो.

सुसेक्स युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर मारियाना ऑब्रिस्ट म्हणातात, जेव्हा जेव्हा आपल्याला लिंबू किंवा इतर कशाचा सुगंध येतो, तेव्हा तो आपल्या शरीराबद्दलचा आपला विचार बदलतो.

लिंबाचे इतर फायदे

  1. लिंबाच्या पाण्यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात. तसेच, कर्करोगाचा धोका कमी होतो.
  2. लिंबूपाण्याचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरात ‘व्हिटामिन-सी’ची कमतरता पूर्ण होते. तसेच, लिंबू आपल्या त्वचेवरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाचा प्रभाव देखील कमी करतो.
  3. लिंबूपाण्यामध्ये फ्लाव्हानॉइड्स, फिनोलिक अॅसिडस् आणि अशी इतर अनेक तेलं आहेत, जी आपल्या शरीराच्या पेशी खराब करणाऱ्या फ्री रॅडिकल्सविरूद्ध लढतात (Study Reveals that Lemon fragrance is useful for body).
  4. लिंबूपाणी पिण्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते, जी तुम्हाला बर्‍याच प्रकारच्या हंगामी रोगांपासून वाचवते.
  5. लिंबामध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स तुमची हाडे, यकृत, स्तन, कोलन आणि पोट कर्करोगापासून शरीराचे संरक्षण करतात.
  6. तसेच लिंबामध्ये एक विशेष प्रकारचे रसायन आढळते. जे आपल्या मेंदूच्या पेशींना विषारी पदार्थांपासून वाचवते, ज्यामुळे अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या रोगांचा धोका देखील कमी होतो.

(Study Reveals that Lemon fragrance is useful for body)

(टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.