Holi 2024 : भारतातील ‘या’ शहरांतील होळी असते अविस्मरणीय ! सेलिब्रेशनची मजा होईल दुप्पट

Holi 2024 : होळीच्या सणाची देशभरात धूम असते. यंदा 24 मार्चला होळी पौर्णिमा आहे आणि दुसऱ्या दिवशी 25 मार्चला रंग खेळले जातील. तसं पहायला गेलं तर संपूर्ण देशात हा सण उत्साहाने साजरा केला जातो, तरी भारतात काही ठिकाणे अशी आहेत जिथे या सणाची मजा काही औरच असते.

Holi 2024 : भारतातील 'या' शहरांतील होळी असते अविस्मरणीय ! सेलिब्रेशनची मजा होईल दुप्पट
होळीचा उत्साह वाढू लागला आहे.
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 3:46 PM

फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो. या सणाचे हिंदू धर्मात खूप महत्व आहे. त्या दिवशी होलिका दहन केले जाते. तर होळीच्या दुसऱ्या दिवशी देशभरात ठिकठिकाणी रंग खेळले जातात. हा सण फक्त भारतातच नव्हे तर इतर विविध देशांतही उत्साहाने सादरा केला जाता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा 24 मार्चला होळी पौर्णिमा आहे तर दुसऱ्या दिवशी 25 मार्चला रंग खेळले जातील

तसं पहायला गेलं तर संपूर्ण देशात हा सण उत्साहाने साजरा केला जातो, तरी भारतात काही ठिकाणे अशी आहेत जिथे या सणाची मजा काही औरच असते. त्या ठिकाणी जाऊन होळी साजरी करायची, रंग खेळायची एक वेगळीच मजा असते. तिथे गेल्यावर तुमची होळीची मजा दुप्पट होते. अशा कोणत्या जागा, शहरं आहेत ते जाणून घेऊया..

मथुरा

हे सुद्धा वाचा

होळीचे नाव येताच मथुरेची आठवण येते. येथील होळी सर्वात अनोखी असते. श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेले मथुरा हे होळीच्या सणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे नागरिक द्वारकाधीश मंदिरात गुलालाने होळी साजरी करतात. तुम्ही मथुरेत होळी साजरी करण्यासाठी जाऊ शकता आणि रंगांच्या सणाचा आनंद लुटू शकता.

उदयपूर

राजस्थानमधील उदयपूरची होळीही खूप प्रसिद्ध आहे. तलावांचे शहर असलेल्या उदयपूरमधील रंगांच्या या उत्सवाचे दृश्य अतिशय विलोभनीय आहे. या दिवशी संपूर्ण शहर होळीच्या रंगात रंगून जाते. तुम्ही इथे फिरायलाही जाऊ शकता.

वृंदावन

भगवान श्रीकृष्णाची नगरी वृंदावनमध्येही होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. इथली अरपनी होळी खूप प्रसिद्ध आहे. रंगांचा सण साजरा करण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. वृंदावनात फुलांची होळी खेळली जाते. बांके बिहारी मंदिरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पुष्कर

राजस्थानातील पुष्कर शहरातही मोठ्या थाटामाटात होळी साजरी केली जाते. फिरण्यासाठी देखील हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची मोठी गर्दी असते. होळीच्या दिवशी येथील लोक रंगात अक्षरश: रंगून गेलेले असतात. त्यामुळे तुम्हालाही होळी संस्मरणीय बनवायची असेल तर तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.