Holi 2024 : फक्त भारतातच नव्हे, या देशांमध्येही होतं होळी सेलिब्रेशन..

| Updated on: Mar 19, 2024 | 4:18 PM

Holi Festival : होळी हा रंगांचा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात देशात साजरा केला जातो. देशभरात लोक वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की भारताव्यतिरिक्त परदेशातही होळीचा सण साजरा केला जातो. ते कोणते देश आहेत, चला जाणून घेऊया.

Holi 2024 : फक्त भारतातच नव्हे, या देशांमध्येही होतं होळी सेलिब्रेशन..
Follow us on

Holi 2024 : होळी म्हणजे रंग, उत्साह, आनंद, मज्जा… रंगांच्या या सणाची लहानथोर सर्वचजण आतुरतेने वाट पहात असतात. होलिकादहन झाल्यावर सर्वजण दुसऱ्या दिवशी आपले कुटुंबीय, मित्रांसोबत रंग खेळतात, एकमेकांना रंग लावतात, होळीच्या शुभेच्छा देतात. उत्तर भारतामध्ये तर हा सण विशेषत: मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. यंदा 24 मार्चला होळी पौर्णिमा झाल्यावर 25 मार्त रोजी रंग खेळण्यात येणार आहेत. या दिवशी पुरणपोळीसह अनेक पक्वान्नं देखील तयार केली जातात.

होळी हा रंगांचा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात आपल्या देशात साजरा केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की भारताव्यतिरिक्त परदेशातही होळीचा सण साजरा केला जातो. तेथे लोक होळीशी मिळताजुळता सण सेलिब्रेट करतात. ते देश कोणते आहेत, चला जाणून घेऊया.

म्यानमार मध्ये होळी

भारताच्या शेजारी देश म्यानमारमध्येही रंगांचा हा सण साजरा केला जातो. म्यानमारमध्ये याला मेकाँग आणि थिंगयान म्हणूनही ओळखले जाते. नववर्षानिमित्त हा सण साजरा केला जातो. या दरम्यान लोक एकमेकांवर रंग आणि पाण्याचा वर्षाव करतात.

नेपाळची होळी

भारताप्रमाणे नेपाळमध्ये होळीचा सण साजरा केला जातो. इथेही लोक पाण्याने फुगे भरून एकमेकांवर फेकतात. यासोबतच येथे लोकांवर रंग उधळले जातात.

इटलीचाही समावेश

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पण इटलीमध्येही होळीसारखा सण साजरा केला जातो. याला ऑरेंज बॅटल म्हणतात. मात्र, हा सण जानेवारीत साजरा केला जातो. येथे रंग लावण्याऐवजी लोक एकमेकांवर टोमॅटो फेकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की स्पेनमध्येही लोक टोमॅटो आणि त्याचा रस एकमेकांवर फेकतात.

मॉरिशसमध्ये सण होतो साजरा

मॉरिशसमध्ये होलिका दहन केले जाते. येथे हा शेतीशी संबंधित सण मानला जातो. मॉरिशसमध्ये हा उत्सव बसंत पंचमीपासून सुरू होतो आणि सुमारे 40 दिवस चालतो.

श्रीलंका

भारताप्रमाणेच श्रीलंकेतही होळी हा सण साजरा केला जातो. इथेही लाल, हिरवा, पिवळा आणि गुलाल, अशा रंगासोबत लोक होळी खेळतात. वॉटर गनमधून लोकं एकमेकांवर पाणी उडवतात.