हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश करताच लाईट सुरु करता? सावधगिरी बाळगा, ही चूक महागात पडू शकते.

आपण जेव्हा फिरायला जातो किंव काही कामानिमित्त हॉटेलमध्ये थांबतो तेव्हा चांगली सुविधा असलेली रुम बुक करतो. पण कधीकधी चांगल्या सुविधा असणाऱ्या रुममध्येही अडचणी येऊ शकतात. त्यासाठी एका हॉटेल कर्मचाऱ्याने स्पष्टपणे हे सांगितले आही की रुम उघडल्यानंतर लगेच लाईट लावू नका. त्यामागचं कारणही तिने सांगितले आहे.

हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश करताच लाईट सुरु करता? सावधगिरी बाळगा, ही चूक महागात पडू शकते.
Hotel room safety, do not turn on the lights as soon as you enter the booked room in the hotel
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Nov 13, 2025 | 1:46 PM

फिरायला गेल्यावर जेव्हा आपण हॉटेल बूक करतो तेव्हा जवळपास आपण सर्वजणच रुममध्ये गेल्यावर सर्वात आधी लाईट लावतो आणि सामान वैगरे ठेवून रुम पाहतो. तसेच काहीजण तर प्रवासाने थकले असल्याने थेट आराम करण्यासाठी बेडवर किंवा सोफ्यावर झोपतात, आराम करतात. पण ही गोष्ट अडचणीत आणू शकते. पण रुममध्ये प्रवेश करताच काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून सुरक्षित प्रवास सुनिश्चित होईल आणि कोणत्याही समस्या टाळता येतील. जर तुम्ही हॉटेलमध्ये राहत असाल तर याबद्दल नक्कीच माहिती असायला हवं.याबद्दल एका हॉटेल कर्मचाऱ्यानेच खुलासा केला आहे.

लाईट का लावू नये?

हॉटेलध्ये रुममध्ये प्रवेश करताच लाईट सुरु का करू नये याची माहिती एक हॉटेल कर्मचारी हेली व्हाईटिंग म्हणते की हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताना लोकांनी पहिली गोष्ट म्हणजे लाईट सुरु करू नये. तिने सुचवले की प्रवाशांनी अंधारात सर्वकाही नीट तपासावे आणि नंतरच लाईट लावावी. याचे कारण तिने सांगितले आहे ते म्हणजे बेडबग्स. व्हाईटिंगच्या मते, अंधारात मोबाईलच्या टॉर्चने किंवा तुमच्याकडे छोटी बॅटरी असेल तर त्याच्या प्रकाशात बेडबग्स सहज दिसतात. ती म्हणते, “कोणत्याही हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताना तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे बेडबग्स आहेत का ते तपासावे.” गेस्टने बेडवर किंवा सोफ्यावर बसण्यापूर्वी गादी, उशा, पडदे आणि फर्निचरचा प्रत्येक कोपरा काळजीपूर्वक तपासावा.

बेडबग्स कसे ओळखावे?

बेडबग्स म्हणजे ज्याला ढेकूण म्हणतात. बेडबग्स हे लहान, पंख नसलेले कीटक आहेत जे सामान्यतः फिकट पिवळे, लाल किंवा तपकिरी रंगाचे असतात. ते कोणतेही गंभीर रोग पसरवत नसले तरी, ते मानवी आणि प्राण्यांचे रक्त पितात, विशेषतः रात्री. त्यांच्या चाव्यामुळे खाज सुटते, अगांवर पुरळ येतात. बहुतेकदा हात, पायावर. बेडबग्स चावल्याने अनेक दिवस अंगाला खाज सुटते आणि अस्वस्थता राहते.

जर तुम्हाला बेडबग आढळले तर काय करावे?

जर तुम्हाला तुमच्या खोलीत बेडबग आढळले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ताबडतोब फोटो काढा आणि सर्व तपशील लिहून ठेवा, जसे की तुम्ही कधी चेक इन केले, तुमचा रूम नंबर आणि समस्या. नंतर ताबडतोब हॉटेल व्यवस्थापन किंवा रिसेप्शनला कळवा.

व्हाईटिंगच्या मते, अशा परिस्थितीत बहुतेक हॉटेल्स तुम्हाला पर्यायी खोली किंवा परतफेड देतात. तथापि, समस्येकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला रात्रभर अस्वस्थ वाटू शकते, खाज सुटल्यामुळे पुरळांचा त्रास होऊ शकतो आणि तुमच्या सामानासोबत हे किटक घरी येण्याची शक्यता असते.