हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश करताच सर्वात आधी पाण्याची बाटली बेडखाली फेका; कारण जाणून थक्क व्हाल
हॉटेल्समध्ये तुम्ही जेव्हा एखादी रुम बुक करता तेव्हा रुममध्ये प्रवेश करताच पाण्याची बाटली बेडखाली फेकून द्यावी. याचं कारण जाणून तुम्हाला ते नक्कीच पटेल आणि अर्थातच विचार करायला लावेल.

जेव्हा आपण कुठे फिरायला जाण्याचा प्लान करतो तेव्हा आपला पहिली गरज असते ती हॉटेल. एक चांगलं, सुरक्षित आणि चांगल्या सोयी-सुविधा असलेलं हॉटेल. पण आजकालचं वातावरण पाहता हॉटेलमध्ये गुप्तपणे कॅमेरे कसे बसवले जातात असे अनेक किस्से आपण ऐकत असतो. एवढेच नाही तर कधीकधी हॉटेलमध्ये एकटे राहिल्यावर सुरक्षितता हा एक मोठा प्रश्न बनतो. मात्र आपण जर थोडीशी सतर्कता आणि समजूतदारपणा दाखवला तर कोणत्याही अनुचित घटनेपासून आपण स्वत:ला वाचवू शकतो. अन्यथा, तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला अडचणीत आणू शकतो.
सर्वात आधी बेडखाली पाण्याची बाटली फेकून का द्यायची?
बऱ्याचदा हॉटेल्स त्यांच्या ग्राहकांना अनेक सुविधा देतात. पण तुम्हाला माहिती आहे का की सर्व सुविधा असूनही, तुम्ही तुमच्या खोलीत चेक-इन करताच सर्वात आधी काय करावं? तुम्ही तुमच्या खोलीत प्रवेश करताच, तुम्ही सर्वात आधी बेडखाली पाण्याची बाटली फेकून द्या. का? याचे कारण जाणून तुमच्या लक्षात येईल हे का महत्त्वाचं आहे ते. बेडखाली पाण्याची बाटली फेकणे तुम्हाला विचित्र वाटेल, परंतु एका अनुभवी फ्लाइट अटेंडंटने तिच्या सोशल मीडियावर ही पद्धत शेअर केली आहे जी हॉटेलमध्ये तुमची सुरक्षितता वाढवू शकते.
जर बाटली अडकली किंवा परत आली नाही तर…..
केएलएम एअरलाइन्सच्या फ्लाइट अटेंडंट एस्थर स्टर्सने एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच ती बेडच्या खाली एका बाजूने पाण्याची बाटली खाली फेकते. जर बाटली दुसऱ्या बाजूने बाहेर आली तर याचा अर्थ बेडखाली काहीही नाही. पण जर बाटली अडकली किंवा परत आली नाही, तर ते तिथे काहीतरी आहे किंवा कोणीतरी लपले असण्याची शक्यता असते.
- hotel room safety
सुटकेस दाराजवळ ठेवणे
हॉटेलच्या रुममध्ये लोक अनेकदा बाथरूम, कपाट आणि पडद्यामागील जागा तपासतात, परंतु बेडखाली तपासणी करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. किंवा ती गोष्ट एवढी लक्षात राहत नाही. आणि बेडखाली वाकून पाहण्यापेक्षा बाटली फेकून तिथे कोणी आहे का हे तपासण्याची पद्धत नक्कीच सुरक्षित आहे. या उपायाव्यतिरिक्त, सुटकेस दाराजवळ ठेवणे ही देखील एक चांगली युक्ती आहे. जर कोणी आत शिरले तर हे तुम्हाला सतर्क करण्यास मदत करू शकते. हॉटेलच्या खोल्या सहसा सुरक्षित असल्या, तरी सावधगिरी बाळगणे कधीही चांगले
बूट लॉकरमध्ये ठेवणे
एस्थर स्टर्स आणखी एक युक्ती सांगते. ती म्हणते, जेव्हा जेव्हा ती हॉटेलच्या खोलीत ती राहते तेव्हा ती तिचे बूट लॉकरमध्ये ठेवते. लोक अनेकदा लॉकर उघडून त्यांचे सामान बाहेर काढायला विसरतात. पण जर बूट लॉकरमध्ये असतील तर बुट काढण्याच्या आठवणीने तरी तुम्ही तुमचे सामान विसरणार नाही.