
पावसाळ्यात कपडे सुकवणे महिलांसाठी सर्वात मोठं आव्हान असतं. कारण पाऊस पडत असल्यामुळे घराबाहेर कपडे वाळत घालता येत नाही… पण कपडे सुकवताना महिलांकडून अजाणतेपणे काही चुका होतात, ज्यामुळे कपडे घराब होऊ शकतात. कपड्यांवर डाग पडू शकतात, किंवा एक कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागू शकतो… अशात कपडे सुकवताना महिलांनी अशा चुका चुकूनही करु नये ज्यामुळे नुकसान होईल… तर कपडे सुकवता अशा 5 चुका बिलकूल करु नका ज्यामुळे नुकसान होईल…
काही महिला कपडे वाळवताना काही चुका करतात, ज्यामुळे कपड्यांवर डाग पडतात आणि हे डाग कपड्यांवरून सहज काढता येत नाहीत. हे डाग केवळ तुमचा कपड्यांचा लूकच खराब करत नाहीत तर अशा डाग असलेले कपडे घालणं देखील चांगलं वाटतं नाही.
कपडे वाळवताना काही महिला कपडे सरळ वाळवतात. पण महिलांनी कपडे नेहमी उलटे वाळवावेत. जर कपडे थेट सूर्यप्रकाशात वाळवले तर डिझाइन आणि रंग दोन्ही फिकट होऊ शकतात. अशा परिस्थितीत महिलांनी कपडे उलटे किंवा आतून बाहेर वाळवावेत.
जेव्हा जोरदार वारा असतो तेव्हा महिला कपडे उडू नयेत म्हणून कपड्यांचे पिन वापरतात. जर पिन लोखंडी किंवा स्टीलच्या असतील तर त्या कपड्यांवर गंजाचे डाग पडण्याची शक्यता नाकारता येत आहे आणि असे डाग सहज निघत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही कपड्यांवर पिन वापरत असलात तरी, कपडे उलटे करा आणि बाजूला ठेवा. कपड्यांमध्ये किंवा कोणत्याही डिझाइनवर पिन वापरू नका. तसेच, लोखंडी पिन वापरण्याऐवजी लाकडी पिन वापरा, ज्यामुळे कपडे खराब होणार नाहीत.
कधीकधी जागा नसल्यामुळे महिला एका कपड्यावर दुसरा कपडा वाळत घालतात, परंतु त्या विसरतात की दोन्ही कपडे ओले आहेत आणि एकमेकांचा रंग दोघांवरही जाऊ शकतो. यामुळे, रंगाचे ठसे उमटतील आणि ते कपडे देखील खराब होतील…
महिला त्यांचे कपडे वाळवण्यापूर्वी व्यवस्थित पिळत नाहीत, त्यामुळे जोरदार वाऱ्याने उडणारी धूळ ओल्या कपड्यांना चिकटते. अशा परिस्थितीत, घाणीमुळे हे कपडे खराब दिसतात. महिलांनी त्यांचे कपडे व्यवस्थित पिळून वाऱ्यावर वाळवावेत त्यामुळे कपड्यांना वास देखील येणार नाही.
जर तुम्ही रंगीत कपडे वाळवत असाल आणि त्या कपड्यांचे डाग पांढऱ्या कपड्यांवर पडले तर ते निघत नाहीत. त्यानंतर ते कपडे पुन्हा घालता येत नाहीत. अशा परिस्थितीत, पांढऱ्या आणि रंगीत कपड्यांना एकाच दोरीवर वाळवू नका, तर त्यांना वेगवेगळ्या दोऱ्यांवर वाळवा, जेणेकरून डाग कपड्यांवर पडणार नाहीत.