Chicken Curry Recipe : वीकेंड बनवा खास बोनलेस चिकन करी सोबत, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

Weekend Special Recipe: वीकेंडला नॉनव्हेज बनवण्याचा विचार करत असाल तर यावेळी बोनलेस चिकन करीची ही रेसिपी ट्राय करा. हे खायला खूप टेस्टी आणि बनवायला सोपी आहे. जाणून घ्या रेसिपी.

Chicken Curry Recipe : वीकेंड बनवा खास बोनलेस चिकन करी सोबत, प्रत्येक जण विचारेल रेसिपी
Chicken Curry Recipe
| Edited By: | Updated on: Nov 13, 2026 | 6:21 PM

जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल आणि वीकेंडला काही खास बनवायचे असेल तर ही चिकन रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. नेहमीच्या चिकन, मटनच्या प्रकाराऐवजी तुम्ही ही डिश नक्की ट्राय करू शकता. बोनलेस चिकन करी केवळ टेस्टीच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. तुम्ही ही रेसिपी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी रोटी, नान किंवा भातासोबत सर्व्ह करू शकता. बोनलेस चिकन करी खाल्ल्यानंतर प्रत्येक जण तुम्हाला याची रेसिपी विचारतील. चला तर मग वाट कसली पाहताय वीकेंड आणखी खास बनवण्यासाठी जाणून घ्या बोनलेस चिकन करीची रेसिपी.

बोनलेस चिकन करी बनवण्यासाठी साहित्य

चिकन मॅरीनेट करण्यासाठी

Loading...

– ५०० ग्रॅम चिकन (१ इंच तुकडे कापलेले)

– २ टेबलस्पून लिंबाचा रस

– २ चमचे काश्मिरी लाल तिखट

– १/२ टीस्पून हळद

– १ टीस्पून मीठ

चिकन करीसाठी

– ५ चमचे मोहरीचे तेल

– २ तमालपत्र

– २ इंच दालचिनीचा तुकडा

– ५-६ काळी मिरी

– ५-६ लवंगा

– २-३ सुक्या लाल मिरच्या

– २ कप बारीक कापलेले कांदे

– १/२ कप बारीक चिरलेला टोमॅटो

– २ चमचे आले लसूण पेस्ट

– ३-४ हिरव्या मिरच्या (अर्ध्या कापलेल्या)

– २ चमचे चिरलेली कोथिंबीर

– १/२ कप साधे दही

– २ चमचे धणे पावडर

– १/२ टीस्पून गरम मसाला

– १/२ टीस्पून जिरे पावडर

– १ कप पाणी

बोनलेस चिकन करी बनवण्याची पद्धत

हे बनवण्यासाठी आधी चिकन मॅरीनेट करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात चिकन, हळद, मीठ, लाल तिखट आणि लिंबाचा रस घालून सर्व नीट मिक्स करा. आता भांडे झाकून ३० मिनिटे बाजूला ठेवा.
चिकन करी बनवण्यासाठी प्रथम मध्यम आचेवर प्रेशर कुकर ठेवा आणि त्यात तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी, लवंगा आणि लाल मिरची घालून ४-५ सेकंद परतून घ्या. यानंतर कांदा टाकून तो हलका तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. ते अधूनमधून ढवळत राहा. आता कुकरमध्ये आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची टाका. कांदा चांगला तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. यानंतर कुकरमध्ये धने पावडर, गरम मसाला आणि जिरेपूड घालून २० ते ३० सेकंद परतून घ्या.

आता कुकरमध्ये प्री-मॅरिनेट केलेले चिकन घालून आणखी ५ मिनिटे परतून घ्या. आता त्यात टोमॅटो आणि दही घालून अधूनमधून ढवळत राहा आणि आणखी ५ मिनिटे शिजवा. आता कुकरमध्ये पाणी घाला आणि सर्व नीट मिक्स करा. कुकरचे झाकण बंद करा आणि २ शिट्ट्या होईपर्यंत चिकनला मंद आचेवर शिजवा. २ शिट्ट्या झाल्यावर चिकन गॅसवरून उतरवा. तुमचे बोनलेस चिकन करी तयार आहे. रोटी, नान किंवा भातासोबत गरमागरम सर्व्ह करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us