Lifestyle News : वीजबिल पाहून बत्ती गुल होते? या टिप्स करा फॉलो, बिल होईल कमी

घरातील उपकरणांचा वापर करण्याची पद्धत बदलूनही विजेचा अनावश्यक वापर कमी करता येतो. फ्रिजची योग्य सेटिंग, देखभाल आणि इन्व्हर्टरची तपासणी यामुळे वीजबिलावर परिणाम होऊ शकतो.

Lifestyle News :  वीजबिल पाहून बत्ती गुल होते? या टिप्स करा फॉलो, बिल होईल कमी
electric bill
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 7:13 PM

महिन्याच्या सुरूवातीला घरात येणारं वीजबील पाहून आपली बत्ती गुल होण्याची वेळ येते. मग सुरू होते बाबांची वीज बचाव मोहिम, हे बंद करा, ते बंद करा,उगाच लावून ठेवता. पण आता त्यांना कोण सांगणार याशिवाय देखील शक्कल लढवून वीजबील कमी करता येतं. कसं ? ते जाणून घ्या.
घरातील काही उपकरणांचा वापर करण्याची पद्धत बदलूनही विजेची बचत करता येते. फ्रिजची योग्य सेटिंग, इन्व्हर्टरची देखभाल आणि छोट्या सवयी यामुळे वीजेचा अनावश्यक वापर कमी होण्यास मदत कमी होऊ शकते.

फ्रिजची कूलिंग सेटिंग योग्य ठेवा

फ्रिज कायम सुरू असल्याने त्याच्या कूलिंग सेटिंगकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. अनेकजण फ्रिजच तापमान कायम कुलिंगवर ठेवतात. मात्र गरजेपेक्षा जास्त थंडावा ठेवल्याने वीजेवर ताण येतो. त्यामुळे फ्रिजच्या सूचना पुस्तिकानुसार योग्य तापमान ठेवा. फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त सामान कोंबून ठेवू नका. आत थंडावा राहण्यासाठी थोडी जागा असणं आवश्यक आहे.

Loading...

फ्रिज भिंतीला चिटकवून ठेवू नका

फ्रिज अगदी भिंतीला लागून ठेवल्यास त्याच्या मागील बाजूला हवा खेळती राहण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे फ्रिजच्या रचनेनुसार भिंतीपासून योग्य अंतरावर ठेवा. मागील बाजूच्या कॉईलवर धूळ साचली असल्यास ती स्वच्छ करा. कारण कॉईवर धूळ साचल्यास फ्रिजला थंडावा राखण्यासाठी अधिक वीज वापरावी लागते त्यामुळे वीजबील वाढू शकते.

फ्रिजचं दार वारंवार उघडणं टाळा

फ्रिजमधून एखादी वस्तू काढताना किंवा बाहेर ठेवताना दार जास्त वेळ उघडं ठेवू नका. प्रत्येक वेळी दार उघडल्यानंतर बाहेरची हवा आत जाते. मग पुन्हा फ्रिजचं तापमान थंड राखण्यासाठी फ्रिजला अधिक वीज वापरावी लागते.

गरमा गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवणे टाळा

गरमा गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवल्याने अधिक वीज खर्च होते. गरम अन्नाला थंड करण्यासाठी फ्रिज अधिक वीज खेचून घेतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा. गरम अन्न साधारण थंड झाल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवावे.

 

इन्वर्टरच्या बॅटरीची वेळोवेळी तपासणी करा

घरातील इन्वर्टर आणि त्याच्या बॅटरीची योग्य देखभाल करणंही महत्त्वाचं आहे. बॅटरी जुनी झाली असेल किंवा तिच्यात काही बिघाड असेल तर चार्जिंगवर परिणाम होऊ शकतो. त्यामळे बॅटरीची स्थिती वेळोवेळी तपासा.

 

इन्वर्टर पूर्ण चार्ज झाल्यानंतर ऑटो कट तपासा

इन्वर्टरची बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर चार्जिंग थांबत आहे का हे तपासणं गरजेचं आहे. ऑटो- कटची सुविधा असल्यास ती व्यवस्थित काम करते आहे का याची खात्री करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us