Beauty Tips : कपड्यांवर लिपस्टिकचे डाग लागले? या सोप्या ट्रिक्सने मिनिटांत करा साफ
मेकअपचा डाग कपड्यावर पडताच शक्य तितक्या लवकर तो साफ करण्याचा प्रयत्न करा. जोरात घासण्याऐवजी मऊ कपड्याने किंवा कापसाने हलक्या हाताने डॅब करा.

चेहऱ्यावरचे मेकअपचे डाग केव्हा केव्हा कपड्यांना लागतात. त्यामुळे बरेचसे कपडे वाया या डागांमुळे आपण घालत नाही. कारण आपल्याला वाटत असतं कि एवढ्या डार्क लिपस्टिकचे डाग कधी जाणारचं नाही. पण तुम्हाला माहित आहे का हे डाग सहज निघू शकतात. काय करायचे, नेमका डाग स्वच्छ कसा करायचा ते जाणून घ्या.
डाग पडल्यावर लगेच स्वच्छ करा
मेकअपचा डाग जितका वेळ कपड्यावर राहतो, तितका तो निघून जायला कठीण असतो. त्यामुळे डाग पडताच त्याला स्वच्छ करण्याचे पर्याय शोधा. या ताजा डाग पाण्याने न घासल्यामुळे तो पसरू शकतो कपडा आणखी खराब होऊ शकतो. त्यामुळे मऊ कपड्याने किंवा कापसाने हलक्या हाताने डाग स्वच्छ करा.
मिसेलर वॉटरचा वापर
फाउंडेशन किंवा इतर मेकअपचा डाग असेल तर कापसावर थोडं मिसेलर वॉटर घेऊन डागावर हलक्या हाताने लावा. डाग पुसताना जोरात घासू नका. हलत्या हाताने डॅब करा ज्यामुळे डाग लवकर निघून जाईल.
डिशवॉश लिक्विड वापर
डागावर मिसेलर वॉटर लावल्यानंतर थोड डिशवॉश लिक्विडही लावता येतं. ते साधारण दोन मिनिटं ठेवून मऊ कपड्याने किंवा बोटांनी हलक्या हाताने साफ करा. लिपस्टिकसारख्या डागांसाठी ग्रीस काढणारा डिश सोप उपयोगी ठरू शकतो.
स्टेन रिमूव्हरचा वापर
लिपस्टिकचा जाडा थर कापडावर लागला असेल तर तो लगेच पाण्याने धुवू नका . चमचा किंवा सपाट वस्तूचे असलेल्या वस्तूने लिपस्टिकचा वरचा थर काढून घ्या. त्यानंतर स्टेन रिमूव्हरने डाग स्वच्छ करा.
रबिंग अल्कोहोल
लिपस्टिक किंवा काही तेलकट, वॉटरप्रूफ मेकअपचे डाग सहज निघत नसतील तर रबिंग अल्कोहोलचा पर्याय वापरू शकता. मात्र हा उपाय करण्याआधी पॅच टेस्ट करणे महत्त्वाचे आहे. रबिंग अल्कोहोल कापसाच्या मदतीने चोळून डाग निघून जाण्यास मदत होऊ शकते.
गरम पाणी वापरण्याची घाई करू नका
मेकअपचा डाग लागला की गरम पाण्यात कपडा भिजवण्याची गरज प्रत्येकवेळी नसते. काही मेकअपमधील रंगद्रव्य आणि तेलकट घटक उष्णतेमुळे कापडात अधिक बसू शकतात.त्यामुळे डाग काढताना कपड्याच्या लेबलनुसार त्यावर प्रयोग करा.